Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाला 'या' राशींच्या लोकांच्या घरावर पैशांचा पाऊस, कोजागिरी पौर्णिमेला मिळणार धनाची पेटी

lunar Eclipse 2023 : दसऱ्यानंतर या वर्षांतील दुसरं आणि शेवटचं चंद्रगहण असणार आहे. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. 

Oct 19, 2023, 17:07 PM IST
1/7

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. याचा मोठा परिणाम 12 राशींवर पडणार आहे. काही राशींसाठी चंद्रग्रहण शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे.   

2/7

या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण हे 28-29 ऑक्टोबरला मध्यरात्री असणार आहे. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण रात्री 11:32 वाजता सुरू होईल आणि 3:56 वाजता संपणार आहे. 

3/7

 दसऱ्यानंतर असणार चंद्रग्रहण हे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशींना धनलाभ होणार आहे. 

4/7

वृषभ (Taurus)

ज्योतिष शास्त्रानुसार हे चंद्रग्रहण वृषभ राशीच्या लोकांनाही लाभदायक असणार आहे. या लोकांना प्रमोशन मिळणार आहे. तुमचा पगार वाढणार आहे. अडकलेले पैसे तुम्हाला मिळणार आहे. आयुष्यात सोनेरी दिवस सुरु होणार आहेत. 

5/7

मिथुन (Gemini)

हे चंद्रग्रहण मिथुन राशीच्या लोकांना भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात लाभ होणार आहे. प्रलंबित पैसे मिळाल्यानंतर तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. घरातील कोणतीही मोठी समस्या दूर चंद्रग्रहणामुळे दूर होणार आहे. 

6/7

वृश्चिक (Scorpio)

हे चंद्रग्रहण वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक फायदा करणारा ठरणार आहे. तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्यावरील कर्जाचं ओझ उतरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती सुधारणार असून तुम्हाला आराम मिळणार आहे. 

7/7

धनु (Sagittarius)

हे चंद्रग्रहण धनु राशीच्या लोकांना अतिशय लाभदायक ठरणार आहे. या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. त्यांना धनलाभ सोबत अनेक अडचणी दूर होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)