12 GB रॅम आणि जबरदस्त कॅमेरा क्वालिटी; सॅमसंगचा एकदम स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच

सॅमसंगने एक बजेट फोन लाँच केला. या फोनची किंमत 20 हजार रुपयांच्या आत आहे. 

Oct 19, 2023, 16:10 PM IST

Samsung Galaxy A05s : Samsung Galaxy A05s हा  स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये 12 GB रॅम सह जबरदस्त क्वालिटी असलेला कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोटोग्राफी सह गेमिंगसाठी हा फोन बेस्ट ऑप्शन आहे. विशेष म्हणजे हा एक बजेट फोन आहे. याची किंमत 20 हजार रुपयांच्या आत आहे. 

1/7

Samsung Galaxy A05s हा मोस्टअवेटेड फोन अखेर भारतात लाँच झाला आहे. 

2/7

Android 13 OS वर हा फोन काम करतो. या फोनमध्ये 5000 mAh दमदार बॅटरीबॅकअप देण्याक आला आहे. या फोनची किंमत 17,499 इतकी आहे.  

3/7

50 मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आहे.  13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असा सेटअर या फोनमध्ये मिशतो.

4/7

या फोनमध्ये फोनमध्ये 6 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे. याच्या मदतीने फोनचा रॅम 12 जीबी पर्यंत वाढवणे शक्य आहे.वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.   

5/7

या फोनमध्ये  2 वर्षांसाठी OS अपग्रेड आणि 4 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत.

6/7

या फोनचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा फोन एकदा खरेदी केल्यावर तब्बल चार वर्ष वापरता येणार आहे. 

7/7

 Samsung Galaxy A05s हा एक मिड रेंज बजेट फोन आहे. या फोनची किंमत 20 हजार रुपयांच्या आत आहे.