जगात भारी Collab... हसून हसून वाट लागणार? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' अन् 'चला हवा...' एकत्र येणार?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'चला हवा येऊ द्या' मधील कलाकारांची झाली अचानक भेट. प्रसाद खांडेकरने शेअर करत म्हणाला, लवकरच...

Soneshwar Patil | Sep 14, 2024, 16:37 PM IST
1/6

विनोदी कार्यक्रम

मराठीमधील 'चला हवा येऊ द्या' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हे दोन वेगवेगळे विनोदी कार्यक्रम आहे. 

2/6

महाराष्ट्राची हास्यजत्रा

गेल्या अनेक वर्षांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार हे प्रेक्षकांना हसवण्याचं काम करत आहेत. या शोला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. 

3/6

चला हवा येऊ द्या

तसेच 'चला हवा येऊ द्या' देखील गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काही महिन्यांपूर्वी हा शो बंद झाला आहे. मात्र, यामधील कलाकार अजूनही चर्चेत आहेत.

4/6

अचानक भेट

अशातच आता 'चला हवा येऊ द्या' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सर्व कलाकारांची अचानक भेट झाली. या भेटीचा एक सेल्फी प्रसाद खांडेकर याने शेअर केला आहे. सध्या तो सर्वत्र व्हायरल होत आहे. 

5/6

कमेंट्सचा वर्षाव

प्रसाद खांडेकर याने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने म्हटलं आहे की, सगळ्यात पाठीमागे कोण आहे...मोरे सर आहेत का...नाही म्हटलं कन्फर्म कराव..अशी कमेंट केली आहे. 

6/6

कॅप्शन चर्चेत

प्रसाद खांडेकरने हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, लवकरच.....पुन्हा भेटू आणि खूप गप्पा मारू असं एकमेकांना प्रॉमिस करून निघालो आम्ही. आज अचानक गाठ पडली..मित्रांबरोबर एक प्रसन्न सकाळ असं त्याने कॅप्शन दिलं आहे.