Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत 'या' 5 मंदिरात देवीला दाखवला जातो मांस आणि मद्याचा नैवेद्य

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीचा उत्साह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मात देवाला शुद्ध शाकाहारी जेवण्याचा नैवेद्य दाखवला जातो. पण या 5 मंदिरात नवरात्रीमध्ये देवाला चक्क मांस आणि मद्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. 

Apr 15, 2024, 09:35 AM IST
1/7

हिंदू धर्मात धार्मिक कार्य आणि देवदेवतांच्या पूजेमध्ये मांस मच्छी आणि मद्य हे निषेध मानलं जातं. अगदी उपवासातही या पदार्थांचं सेवन वर्ज्य मानलं जातं. 

2/7

मग देवाली चक्क मद्य आणि मांस नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची परंपरा आहे. कुठली आहेत ही मंदिरं आणि काय आहे मागील संकल्पना जाणून घेऊयात. 

3/7

कोलकाता काली मंदिर

कोलकाता काली मंदिर हे शक्तीपीठांपैकी एक असून इथे नवरात्रीमध्ये मासं आणि मद्य दाखवलं जातं. पौराणिक आख्यायिकेनुसार, असं म्हटलं जातं की, या मंदिरात देवी सतीची बोटे पडली होती. या देवीला चटणी, पुलाव आणि खीरसह देवीला मांस नैवेद्य म्हणून दाखवलं जातं.   

4/7

गुवाहाटीचे कामाख्या मंदिर

भारतातील गुवाहाटी मंदिर हे तंत्र मंत्र अभ्यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरातही देवीला मांस आणि मद्याचं नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.   

5/7

ओरिसाचे विमला मंदिर

ओरिसाच्या विमल मंदिरातील ही आगळी वेगळी प्रथा आहे. या मंदिरातील दुर्गापूजेच्या वेळी मार्कंडा मंदिराच्या तलावातून पकडलेले मासे शिजवून देवाला अर्पण करण्यात येतं. या प्रथेला इथळी असं म्हटलं जातं. 

6/7

गोरखपूरचे तारकुल्हा देवी मंदिर

गोरखपूरच्या तारकुल्हा देवी मंदिरातही देवीला मांहार अर्पण करण्यात येतो. शिवाय भक्तांना प्रसाद म्हणून मटणाचं वाटप होतं.   

7/7

उज्जैनचे गढकालिका मंदिर

मध्य प्रदेशातील उज्जैनमधील गडकालिका मंदिर हे महान कवी कालिदास यांचं कुलदैवत आहे. या मंदिरातही नवरात्रीमध्ये देवीला मद्य अर्पण केलं जातं.