सावधान! भारतात पसरतोय जीवघेणा 'कॅंडिडा ऑरिस' फंगस

Apr 11, 2019, 13:12 PM IST
1/6

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात एक रहस्यमयी संसर्गजन्य रोग वेगाने पसरत असून या रोगावर कोणताही उपचार नसल्याचे सांगण्यात येत आहे. 'कॅंडिडा ऑरिस' असे या फंगसचे नाव आहे.

2/6

माणसाच्या मृत्यूनंतरही हा फंगस नष्ट होत नाही तर एका शरीरातून तो दुसऱ्या शरीरात वेगाने पसरतो. या रोगाचा पहिला रूग्ण ब्रुकलिनमध्ये आढळला होता. या व्यक्तीच्या ब्लड टेस्टमधून डॉक्टरांना हा जीवघेणा संसर्गजन्य रोग असल्याचे समजले.

3/6

यूएस, यूरोपनंतर आता हा फंगस भारत, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेतही पसरण्यात सुरूवात झाली आहे. 

4/6

या रोगावर कोणताही उपचार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या रोगाची लागण झाल्यस रूग्ण ९० दिवसांत दगावत असल्याचे समोर आले आहे. 

5/6

ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्याच लोकांमध्ये 'कॅंडिडा ऑरिस' फंगस बळावत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

6/6

डॉ. स्कॉट लॉरिन यांनी 'कॅंडिडा ऑरिस' फंगस अतिशय धोकादायक असून यावर अॅन्टीफंगल मेडिकेशनचाही परिणाम होत नसल्याचे सांगितले.