कॅनेडीयन पंतप्रधान जस्टीन ट्रुडोंची सुवर्णमंदिराला सहपरिवार भेट

Feb 21, 2018, 19:58 PM IST
1/6

Canadian prime minister Justin Trudeau visit golden temple in Amritsar

सात दिवसांंच्या भारत दौर्‍यावर असणार्‍या पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी बुधवारी पंजाबला भेट दिली. हरदीप सिंह पुरी आणि नवजोत सिंह सिद्धू यांनी त्यांचे स्वागत केले.  

2/6

Canadian prime minister Justin Trudeau visit golden temple in Amritsar

Canadian prime minister Justin Trudeau visit golden temple in Amritsar

पंजाबच्या नेत्यांंशी भेट घेतल्यानंतर ट्रूडो यांनी भारतीय वेषभूषेमध्ये गुरूद्वारा आणि सुवर्णमंदिराला भेट दिली. 

3/6

Canadian prime minister Justin Trudeau visit golden temple in Amritsar

Canadian prime minister Justin Trudeau visit golden temple in Amritsar

सुवर्णमंदिरात दर्शन घेताना त्यांनी सफेद रंगाचा कुर्ता आणि डोक्यावर दरबार साहिबचा कपडा बांधला होता. सोबतच त्यांची पत्नी आणि तिन्ही मुलं भारतीय वेषभूषेमध्ये दिसले. दर्शन झाल्यानंतर ट्रुडो परिवाराने हात जोडून अभिवादन केले.

4/6

Canadian prime minister Justin Trudeau visit golden temple in Amritsar

Canadian prime minister Justin Trudeau visit golden temple in Amritsar

जस्टिन ट्रूडो यांंच्या पंजाब दौर्‍यामध्ये त्यांंच्या सुरक्षेची खास सोय ठेवण्यात आली आहे. याकरिता 1500 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

5/6

Canadian prime minister Justin Trudeau visit golden temple in Amritsar

Canadian prime minister Justin Trudeau visit golden temple in Amritsar

सुवर्णमंदिराला भेट दिल्यानंतर त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांंची भेट घेतली. दरम्यान या दोघांमध्ये व्यापार सोबतच इतर काही महत्त्वपूर्ण गोष्टींवर चर्चा झाली. 

6/6

Canadian prime minister Justin Trudeau visit golden temple in Amritsar

Canadian prime minister Justin Trudeau visit golden temple in Amritsar

पंजाबच्या दौर्‍यापूर्वी टुड्रोंनी गुजरातचा दौरा केला होता. अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला भेट दिली सोबतच ट्रुडो पत्नीसोबत चरखा  चालवताना दिसले. (फोटो साभार: IANS)