Budget Trip: अवघ्या १० हजार रुपयांत सेलिब्रेट करा Christmas आणि New Year

कमी खर्चात ख्रिसमस आणि नवं वर्षाचं प्लानिंग करा !

Dec 23, 2020, 17:24 PM IST

कमी खर्चात ख्रिसमस आणि नवं वर्षाचं प्लानिंग करा !

1/4

औलीचे सौंदर्य प्रेमात पाडेल

औलीचे सौंदर्य प्रेमात पाडेल

उत्तराखंडमधील औली नावाचे एक छोटे गाव आहे. थंडीमध्ये इथे सगळीकडे बर्फच बर्फ दिसतो. इथले सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक दुरुन येतात. थंडीच्या दिवसात इथले तापमान ० अंश सेल्सियस असते. दिल्लीहून औलीला पोहोचण्यासाठी १४ तासांचा वेळ लागतो. चांगल्या दरात इथे हॉटेल देखील उपलब्ध आहेत.

2/4

ऋषिकेशमध्ये मनाला मिळेल शांती

ऋषिकेशमध्ये मनाला मिळेल शांती

उत्तराखंडमध्ये असलेल्या ऋषिकेशच्या तटावर गंगा आरतीचा आनंद घेतला जाऊ शकतो. कित्येक कंपन्या 4000 ते 5000 रुपयांपासून ऋषिकेशची पूर्ण यात्रा घडवतात. इथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात.

3/4

तवांगचे मनमोहक सौंदर्य

तवांगचे मनमोहक सौंदर्य

अरुणाचल प्रदेशमधील तवांग  (Tawang).थंडीच्या दिवसात मनमोहक दिसते. इथे येणारे प्रत्येकाला प्रफुल्लित वाटते. इथे जास्त करुन बौद्ध मठातील लोकं दिसतात. इथे फिरल्यास जास्त खर्च नसतो.

4/4

मसुरीमध्ये कमी पैशांत जास्त मज्जा

मसुरीमध्ये कमी पैशांत जास्त मज्जा

उत्तराखंडमध्ये असलेले मसूरी हे प्रसिद्ध आणि सुंदर हिल स्टेशन (Hill Station) आहे. इथे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात बर्फ पडतो. देहरादूहून मसूरी ४० किलोमीटर आहे. इथे तुम्ही १० हजार रुपयांत आरामात फिरु शकता.