लग्नाआधी या ७ गोष्टींवर चर्चा करा, नंतर होणार नाहीत गैरसमज

लग्न करण्याआधी या गोष्टी समजून घ्या ! 

Dec 23, 2020, 16:08 PM IST

लग्न करण्याआधी या गोष्टी समजून घ्या ! 

1/8

याआधी मुलगा-मुलगी एकमेकांना न बघता लग्न ठरवायचे. पण आताचा जमाना वेगळा आहे. कोणताही मुलगा-मुलगी पार्टनर निवडण्याआधी खूप विचार करतात. एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतात.

2/8

स्वावलंबी होण्यासोबत परिपक्वता !

स्वावलंबी होण्यासोबत परिपक्वता !

स्वावलंबी असण्यासोबत समजदार मुलगी मुलांना जास्त आवडते. अशा मुली सर्व परिस्थिती शांतपणे, चांगल्याप्रकारे संभाळतात. तुम्ही मुलगी बघायला जात असाल तर प्रश्न-उत्तरांमध्ये हे समजून घ्या.

3/8

आवडी-निवडी समजून घ्या !

आवडी-निवडी समजून घ्या !

तुम्हाला काय करायला आवडत ? काय नाही आवडत ? या सर्वांबद्दल खुलेपणाने बोला.दोघांच्या नात्यात कंटाळा येण्यापासून तुम्ही वाचू शकाल. तुम्हाला तुमच्या भावी पार्टनरबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.

4/8

घर आणि परिवाराची समज

घर आणि परिवाराची समज

सुखी वैवाहीक जीवनासाठी अशी व्यक्ती निवडा जी तुमच्या परिवाराचे रितीरिवाज समजू शकेल. ज्या मुलीशी तुम्हाला लग्न करायचंय तिला आपल्या परिवाराच्या जबाबदारीची जाणीव असावी. लग्नानंतर तुमच्याकडून परिवाराला काय अपेक्षा आहेत ? हे देखील आधीच स्पष्ट करा.

5/8

जुनी नाती आणि मित्रांबद्दल चर्चा करा !

जुनी नाती आणि मित्रांबद्दल चर्चा करा !

लग्नाआधी पार्टनरसोबत जुनी नाती आणि मित्रांबद्दल चर्चा करा. तुमचा पार्टनर यासर्वांबाबत कसा रिएक्ट होतो हे तुम्हाला कळेल. या कारणांमुळे देखील भांडण होऊ शकते.

6/8

फॅमिली प्लानिंग नक्की करा !

फॅमिली प्लानिंग नक्की करा !

जर तुमच्या मनात फॅमिली प्लानिंग संदर्भात काही शंका असतील तर त्यांचे निरसन आताच करा. तुझे फॅमिली प्लानिंग संदर्भात काय मत आहे ? हे पार्टनरला नक्की विचारा. लग्नानंतर लगेच बाळ पाहीजे का नको ? यावर चर्चा करा. असे केल्यास तुम्ही एकमेकांना जास्त ओळखाल.   

7/8

करियर संदर्भात बोला !

करियर संदर्भात बोला !

तू लग्नानंतर जॉब करणार की नाही ? हे मुलाने मुलीला विचारायला हवे.जर जॉब करायचा असेल तर ती घर आणि काम कसं संभाळणार ? हे विचारायला हवं. नंतर जॉब करण्यासंदर्भात किंवा न करण्यासंदर्भात खडके उडू नयेत.  

8/8

आपल्या लाईफ पार्टनरकडे खूप काही गुण असावेत अशाची काही गरज नसते. गुणांसोबत तुमचे विचार एकमेकांशी जुळणे देखील महत्वाचे असतात. वैवाहीक आयुष्य कोण कसे जगेल ? सांगू शकत नाही. पण हे सर्व तुमच्या विश्वास आणि समझदारीवर अवलंबून असेल.