BOM Job: पदवीधरांनो तयारी लागा! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती, 78 हजारपर्यंत मिळेल पगार

| Jul 14, 2023, 13:42 PM IST
1/7

BOM Job: पदवीधरांनो तयारी लागा! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती, 78 हजारपर्यंत मिळेल पगार

BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online

BOM Recruitment: ग्रॅज्युएट होऊन अजूनही चांगल्या नोकरीच्या प्रतिक्षेत आहात? तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आता तुम्हाला जास्त दिवस घरी थांबावे लागणार नाही. कारण बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरतीची सुरुवात झाली आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

2/7

बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती

BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online

बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर स्केल II आणि ऑफिसर स्केल III च्या पदांची भरती केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, पगार यांचा तपशील पुढे देण्यात आला आहे. त्यामुळे जास्त उशीर न करता लवकरच बॅंक भरतीसाठी अर्ज करा. 

3/7

ऑफिसर स्केल II पदाचा तपशील

BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online

बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर स्केल II च्या एकूण 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशनमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणे गरजेचे आहे. किंवा सीए/सीएमए/सीएफए पूर्ण केलेले असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षांदरम्यान असावे. 

4/7

ऑफिसर स्केल III पदाचा तपशील

BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online

ऑफिसर स्केल III च्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी . यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशनमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणे गरजेचे आहे. किंवा सीए/सीएमए/सीएफए पूर्ण केलेले असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 38 वर्षांदरम्यान असावे. 

5/7

परीक्षा शुल्क

BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online

निवड झालेल्या उमेदवारांना 2 वर्षाचा कामाचा करार करावा लागेल. तसेच दोन्ही पदांसाठी 6 महिन्यांचा प्रोबेशन कालावधी असेल.जनरल/ओबीसी/ईडब्लूएस उमेदवारांकडून 1,180 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल. तर एसटी/पीडब्लूडी उमेदवारांकडून 118 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल.

6/7

पगार

BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online

ऑफिसर स्केल II पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 48 हजार 170 ते 69 हजार 810 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहेत. तर ऑफिसर स्केल III पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 63 हजार 840 ते 78 हजार 230 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.  

7/7

अर्जाची शेवटची तारीख

BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online

यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 25 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरी करता येणार आहे.