Bollywood Top Flop Movies 2022: मोठी स्टारकास्ट, बीग बजेट चित्रपट पण प्रेक्षकांनी फिरवली पाठ; 2022 मधले 'हे' आहेत सर्वात Flop चित्रपट

बॉलीवूडसाठी मागचं वर्ष समाधानकारक असलं तरी हे वर्ष मात्र बॉलीवूडसाठी सर्वात वाईट ठरलं. बायकोटच्या ट्रेण्डपासून ते बॉक्स ऑफिस कलेक्शनपर्यंत (box office collection) बॉलीवूड सिनेमा सगळ्यातच फ्लॉप ठरला आणि एक वेगळंच ग्रहण हिंदी सिनेसृष्टीवर पाहायला मिळाले. त्यामुळे आमिर खान, अक्षय कुमार (akshay kumar), आयुष्यमान खुराना, कंगना राणावत आणि रणबीर कपूरसारख्या अनेक नामवंत कलाकारांची जादू यंदाच्या वर्षीची बॉक्स ऑफिसवर फारशी चाललेली पाहायला मिळाली नाही. या तारकांनी कितीही प्रयत्न केले तरी मात्र काही केल्या या वर्षी बॉलीवूडकडे प्रेक्षकांनी पाठच फिरवली होती. 

Dec 09, 2022, 18:36 PM IST

Bollywood Top Flop Movies 2022: बॉलीवूडसाठी मागचं वर्ष समाधानकारक असलं तरी हे वर्ष मात्र बॉलीवूडसाठी सर्वात वाईट ठरलं. बायकोटच्या ट्रेण्डपासून ते बॉक्स ऑफिस कलेक्शनपर्यंत (box office collection) बॉलीवूड सिनेमा सगळ्यातच फ्लॉप ठरला आणि एक वेगळंच ग्रहण हिंदी सिनेसृष्टीवर पाहायला मिळाले. त्यामुळे आमिर खान, अक्षय कुमार (akshay kumar), आयुष्यमान खुराना, कंगना राणावत आणि रणबीर कपूरसारख्या अनेक नामवंत कलाकारांची जादू यंदाच्या वर्षीची बॉक्स ऑफिसवर फारशी चाललेली पाहायला मिळाली नाही. या तारकांनी कितीही प्रयत्न केले तरी मात्र काही केल्या या वर्षी बॉलीवूडकडे प्रेक्षकांनी पाठच फिरवली होती. 

1/6

धाकड

dhakad

कंगना राणावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायमच चर्चेत असते. त्यातून तिचे चित्रपटही यंदा फ्लॉप ठरले आहेत. यावर्षी तिचा धाकड हा सिनेमा तिकीटबारीवर जोरदार आपटला. या चित्रपटासाठी आठवडाभरही प्रेक्षक आले नाहीत.

2/6

लायगर

Liger

साऊथ इंडियन फिल्म सुपरस्टार विजय देवरकोंडानं यावर्षी लायगर या पहिल्या वहिल्या बॉलीवूड चित्रपटातून डेब्यू केला होता. हा चित्रपट हिट होईल अशी परिस्थिती असताना मात्र हा चित्रपट प्रचंड मोठ्या प्रमाणात फ्लॉप झाला. या चित्रपटात अनेक बॉलीवूड आणि टॉलीवूड सुपरस्टार होते. अनन्या पांडे त्याच्यासोबत लिड हिरोईन होती.   

3/6

अ‍ॅक्शन हिरो

action hero

आयुष्मान खुराना आपल्या वेगळ्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. वेगळा आशय देत त्यानं अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत. परंतु यावर्षी त्याच्या चित्रपटांचं नाणं बॉक्स ऑफिसवर फारसं काही चाललं नाही. यावर्षीच्या सुरूवातीलाच त्याचा डॉक्टर जी फ्लॉप झाला त्याचसोबत नुकताच आलेला अ‍ॅक्शन हिरो हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपली फारशी जादू दाखवू शकला नाही. 

4/6

शमशेरा

shamshera

खरंतर अभिनेता रणबीर कपूरासाठी हे वर्ष खूपच खास होतं. तब्बल चार वर्षांनी तो बॉलीवूडमध्ये कमबॅक करत होता. त्यादरम्यान आपल्या आणि आलिया भट्टच्या लव्ह अफेअरमुळे तो भलताच चर्चेत होता. त्यातून आपला सिनेमा आणि आलियाशी लग्न या दोन गोष्टींमुळे रणबीरची लोकप्रियता अधिक वाढली होती. आता तो एका गोंडस मुलीचा राहा कपूरचा बापही झाला आहे. परंतु हे वर्ष मात्र त्याच्या फार काही खास ठरलं नाही, चित्रपटांच्याबाबतीत तरी. कारण यावर्षी आलेले त्याचे दोन्ही सिनेम बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेले. त्यात शमशेरा बॉक्स ऑफिसवर जोरात आपटला. 

5/6

लाल सिंग चड्ढा

Laal Singh Chaddha

गेली पाच वर्ष तरी आमिर खान लाल सिंग चड्ढा हा चित्रपट आणण्याच्या तयारीत होता. हा चित्रपट अमेरिकन ब्लॉकबस्टर फिल्म द फॉरेस्ट गम्पचा रिमेक आहे. त्यामुळे बॉलीवूड असा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्यानं सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली होती. परंतु या चित्रपटाच्या ट्रेलरनेच प्रेक्षकांची घोर निराशा केली आणि या चित्रपटाला बॉयकॉट करण्याच्या मागण्या सोशल मीडियावर येऊ लागल्या. भरपुर मेहनतीनं बनवलेला हा चित्रपट काही बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. 

6/6

सम्राट पृथ्वीराज

Samraj Prithiviraj

करोनाच्या आधीपासूनच या चित्रपटाची जोरात चर्चा होती. या चित्रपटातून काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी अपेक्षाही प्रेक्षकांनी लागून राहिली होती. 2017 साली मिस वर्ल्ड ठरलेल्या मानुषी छिल्लरचा हा पहिला वहिला सिनेमा होता. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा एक विशेष पर्वणी होती. त्यातून बॉलीवूडचा खिलाडी सुपरस्टार अक्षय कुमार या चित्रपटात होता म्हटल्यावर तर या सिनेमाला वेगळीच लोकप्रियता मिळेल अशी अपेक्षाही प्रेक्षकांना होती. परंतु खराब पटकथा आणि चुकीचा इतिहास यामुळे हा चित्रपट संपुर्णत: फ्लॉप ठरला.