बॉलिवूडवर गाजवणाऱ्या 'या' दिग्गज कलाकारांनी बदललयं स्वत:चं नाव

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमवण्यासाठी प्रत्येक कलाकार काही ना काही युक्त्या वापरतात. यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असणारी युक्ती म्हणजे नाव आणि आडनावात बदल करणं. कित्येक कलाकारांनी नावात आणि आडनावात बदल केला आणि चित्रपटसृष्टीमध्ये नवी ओळख निर्माण केली. या यादीमध्ये मल्लीका शेरावत (Mallika Sehrawat) ते सनी लियोन (Sunny Leone) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) ते अमिताभ बच्चनपर्यंत (Amitabh Bachchan) अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. 

Sep 06, 2022, 21:01 PM IST
1/8

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)

सध्या बॉलिवूडचा धडाडीचा अभिनेता असलेल्या कार्तिक आर्यनचं खरं नाव 'कार्तिक तिवारी' आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर त्याने स्वत:च्या नावात बदल केलाय.

2/8

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं खरं नाव 'इंकलाब श्रीवास्तव' हे आहे.

3/8

अक्षय कुमार (Akshay Kumar)

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असणारा अक्षय कुमारचं खरं नाव 'ओम भाटिया' हे आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अक्षय कुमारने नावासोबतच आडनाव देखील बदललं आहे. 

4/8

दिलीप कुमार (Dilip Kumar)

दिलीप कुमार यांच खरं नाव 'युसूफ सरवर खान' हे आहे. दिलीप कुमारांनी अनेक वर्षे सिनेमासृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली.

5/8

कटरीना कैफ (Katrina Kaif)

कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं आहे. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच कतरिना कैफने स्वत:च्या नावात बदल केला. कतरिना कैफचं खरं नाव 'केट तुर्कोटे' हे आहे.

6/8

मल्लिका शेरावत (Mallika Sehrawat)

बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावतचं खरं नाव रीमा लांबा हबे आहे. चित्रपटांमध्ये नावं करण्यासाठी तिने स्वत:चं नाव बदललं.

7/8

श्रीदेवी (Sridevi)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचं खरं नाव 'श्री अम्मा येंगर अय्यपन' हे होतं.

8/8

सनी लियोन (Sunny Leone)

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सनी लियोनचं खरं नाव 'करनजीत कौर वोहरा' असं आहे.