आपल्या खास क्षणाला जवळ केली आईच्या साडीची ऊब, सोनाक्षीसह 'या' अभिनेत्रींनी निवडली 44 वर्षांहून जुनी साडी

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नसराई पाहायला मिळत आहे. बी टाऊनची सुंदर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच वधू म्हणून मिरवताना दिसत नाही. 23 जून रोजी एका इंटीमेट सेरेमनीमध्ये अभिनेत्रीने लाँग टाइम बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत लग्नबंधनात अडकली. हा शाही विवाहसोहळा अतिशय साधेपद्धतीने 'रामायण' या सोनाक्षीच्या घरी पार पडला. यावेळी सोनाक्षीने कॅरी केलेल्या 44 वर्षीय जुन्या साडीने आणि दागिन्यांनी लक्ष वेधलं होतं. 

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नसराई पाहायला मिळत आहे. बी टाऊनची सुंदर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच वधू म्हणून मिरवताना दिसत नाही. 23 जून रोजी एका इंटीमेट सेरेमनीमध्ये अभिनेत्रीने लाँग टाइम बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत लग्नबंधनात अडकली. हा शाही विवाहसोहळा अतिशय साधेपद्धतीने 'रामायण' या सोनाक्षीच्या घरी पार पडला. यावेळी सोनाक्षीने कॅरी केलेल्या 44 वर्षीय जुन्या साडीने आणि दागिन्यांनी लक्ष वेधलं होतं. 

1/7

मोजक्या व्यक्तींमध्ये हा सोहळा

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर यांनी अतिशय खासगी विवाह सोहळा ठेवला होता. या सोहळ्याला फक्त  घरची मंडळी आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. अशावेळी मुली अनेकदा आपल्या आई किंवा सासूच्या लग्नाचे दागिने आणि साडी परिधान करतात. हा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक सामान्य मुली हा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. 

2/7

लग्नाच्या साडीत मायेची ऊब

सोनाक्षी सिन्हाने आपल्या लग्नप्रसंगी पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी कॅरी केली होती. सोनाक्षीने यावेळी 44 वर्षांपूर्वींची आईची साडी नेसली होती. ज्येष्ठ अभिनेता आणि वधुचे वडिल शत्रुग्घन सिन्हा यांच्या लग्नात पूनम सिन्हा यांनी हीच साडी नेसली होती. सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी या साडीचा जुना फोटो शेअर केला आहे. तर जहीर ट्विनिंग करताना दिसला आणि त्याने याच रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. 

3/7

रजिस्टर पद्धतीने सोहळा

सोनाक्षी सिन्हा हिंदू असून तिचा बॉयफ्रेंड जहीर इकबाल मुस्लिम आहे. मात्र या दोघांनी रजिस्टर्ड मॅरेज करुन लग्नगाठ बांधली. हा विवाह सोहळा नक्की कोणत्या पद्धतीने होणार अशी चर्चा रंगली होती. पण सोनाक्षी आणि जहीरने या चर्चांना रजिस्टर मॅरेज करुन पूर्ण विराम दिला. 

4/7

दागिन्यांचीही खास आठवण

सोनाक्षी सिन्हाने आपला लुक स्पेशल पद्धतीने पूर्ण करण्यासाठी खास ज्वेलरी कॅरी केली आहे. यावेळी सोनाक्षीने कुंदनचा नेकलेस, सोन्याच्या बांगड्या आणि कुंदनची बाली कॅरी केली होती. या फोटोंनी सोशल मीडियावर युझर्सच लक्ष वेधलं आहे. 

5/7

यामी गौतमी

यामी गौतमने कोरोनाच्या काळात अतिशय साधेपणाने लग्न केले. लग्नात तिने आईची साडी नेसली होती. हा साडी लुक पूर्ण करण्यासाठी तिने सिल्क साडीसोबत मॅचिंग दुपट्टा घातला होता, ज्यामध्ये यामी खूपच सुंदर दिसत होती. पारंपारिक दागिन्यांनी तिच्या लग्नाच्या लूकमध्ये आकर्षण वाढवले.

6/7

गुल पनाग

अभिनेत्री गुल पनागने तिच्या लग्न समारंभात आई आणि सासूचे कपडे कॅरी केले होते. तिने तिच्या लग्नासाठी तिच्या आईचा गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता, तर तिने संगीत रात्रीसाठी तिच्या सासूचा ड्रेस घातला होता. दोन्ही आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

7/7

करिना कपूर

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने 2012 मध्ये पतौडी घराण्याचे नवाब आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. या लग्नात तिने तीन पिढ्यांचा अमूल्य पोशाख परिधान केला होता. सैफ अली खानची आजी बेगम साजिदा सुलतानने तिच्या लग्नात हा शरारा परिधान केला होता. यानंतर सैफची आई शर्मिला यांनी 27 डिसेंबर 1968 रोजी पतौडी कुटुंबातील नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी विवाह केला तेव्हा त्यांनी हा शरारा घातला होता. यानंतर पतौडी घराण्याच्या परंपरेला अनुसरून करीनाने आपल्या लग्नात हाच शरारा सूट परिधान केला होता. या शरारा सूटमध्ये करीना खूपच सुंदर दिसत होती.