विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरही दीपिकाची जादू

Jul 15, 2019, 11:28 AM IST
1/7

विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरही दीपिकाची जादू

रविवारच्या दिवशी क्रिकेट आणि टेनिस अशा दोन्ही खेळांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस होता. प्रत्येक खेळातील महत्त्वाच्या स्पर्धांच्या अंतिम फेरी रविवारी पार पडल्या. एकिकडे क्रिकेट विश्वचषकाची अंतिम फेरी रंगत होती. तर, दुसरीकडे विम्बल्डन या मानाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीचीही अंतिम फेरी रंगली होती. नोवाह जोकोविच आणि रॉजर फेडरर या दोन्ही खेळाडूंमध्ये हा अंतिम सामना रंगला. 

2/7

विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरही दीपिकाची जादू

सेंटर कोर्टवर खेळल्या गेलेल्या या सामन्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्यांसह उपस्थिती होती ती म्हणजे आणखीही काही सेलिब्रिटींची. याच सेलिब्रिटींमधील एक नाव म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचं.(छाया सौजन्य- naokoscintu/ इन्स्टाग्राम)

3/7

विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरही दीपिकाची जादू

टेनिस या खेळाप्रती कमालीची आत्मियता असणाऱी दीपिका तिच्या बहिणीसह म्हणजे अनिशा पदुकोण हिच्यासह विम्बल्डनच्या अंतिम सामन्याचा अनुभव घेण्यासाठी पोहोचली होती. (छाया सौजन्य- राल्फ लॉरेन/ इन्स्टाग्राम)

4/7

विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरही दीपिकाची जादू

खुद्द दीपिकानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देत सामन्यासाठीच्या प्रवेशिकांचा फोटो पोस्ट केला होता. ज्यावर तिचं आणि तिच्या बहिणीचं म्हणजेच अनिशा पदुकोण हिचं नाव होतं. (छाया सौजन्य- दीपिका पदुकोण/ इन्स्टाग्राम)

5/7

विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरही दीपिकाची जादू

विम्बल्डनच्या अंतिम सामन्यासाठी दीपिकाने सुरेख अशा पांढऱ्या रंगाच्या वेशभूषेला प्राधान्य दिलं. यावेळी तिने राल्फ लॉरेनच्या कपड्यांना पसंती दिली होती. (छाया सौजन्य- राल्फ लॉरेन/ इन्स्टाग्राम)

6/7

विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरही दीपिकाची जादू

(वजनाने हलक्या) लाईटवेट सिल्क जॉर्जेट ब्लाऊस आणि कॉटन लिनन प्लाझोच्या डिझायनर ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. याला तिने जोड दिली होती ती म्हणजे सुंदर अशा हँडबॅगची. (छाया सौजन्य- राल्फ लॉरेन/ इन्स्टाग्राम)

7/7

विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरही दीपिकाची जादू

दीपिकाचा हा एकंदर लूक पाहता विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरही बी- टाऊनच्या या सौंदर्यवतीचीच जादू पाहायला मिळाली असं म्हणायला हरकत नाही. (छाया सौजन्य-  इन्स्टाग्राम)