'तिच्या'सोबत गोव्याच्या सफरीवर बी-टाऊनचा 'न्यूटन'

Oct 31, 2018, 13:00 PM IST
1/7

'तिच्या'सोबत गोव्याच्या सफरीवर बी-टाऊनचा 'न्यूटन'

'न्यूटन', 'स्त्री' असा विविध धाटणीच्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता राजकुमार रावने त्याच्या खासगी आयुष्याविषयी नेहमीच खुलेपणाने बोलण्यास प्राधान्य दिलं आहे. 

2/7

'तिच्या'सोबत गोव्याच्या सफरीवर बी-टाऊनचा 'न्यूटन'

अभिनेत्री पत्रलेखा हिच्यासोबत तो रिलेशनशिपमध्ये असून, सोशल मीडियावरही ते नेहमीच बरेच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आपल्या प्रेमाची ग्वाही देत असतात. 

3/7

'तिच्या'सोबत गोव्याच्या सफरीवर बी-टाऊनचा 'न्यूटन'

सध्याच्या घडीला ही जोडी शहरी घाईगडबडीपासून काही निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी म्हणून शहरापासून काहीशी दूर गेली आहे. 

4/7

'तिच्या'सोबत गोव्याच्या सफरीवर बी-टाऊनचा 'न्यूटन'

पत्रलेखा आणि राजकुमारचे सोशल मीडियावरील फोटो पाहता ते गोव्यात सुट्टीचा आनंद घेत असल्याचं कळत आहे. एका कंपनीच्या जाहिरातीच्या निमित्ताने का असेना, पण त्यांमना एकमेकांसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळाली आहे. 

5/7

'तिच्या'सोबत गोव्याच्या सफरीवर बी-टाऊनचा 'न्यूटन'

गोवा हे ठिकाण आपल्या हृदयाच्या अतिशय जवळचं असून, आमचं या ठिकाणी वारंवार येणंजाणं असतं, असं म्हणत पत्रलेखाने गोव्याशी असलेल्या तिच्या नात्याविषयी सांगितलं. 

6/7

'तिच्या'सोबत गोव्याच्या सफरीवर बी-टाऊनचा 'न्यूटन'

मुख्य म्हणजे राजकुमार आणि पत्रलेखा गोव्याचा उल्लेख त्यांचं सेकंड होम म्हणूनही करतात, असं ती आयएएनएस या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाली. 

7/7

'तिच्या'सोबत गोव्याच्या सफरीवर बी-टाऊनचा 'न्यूटन'

राजकुमार आणि पत्रलेखाचे हे सुरेख फोटो पाहता अनेक प्रेमी युगुलांसाठी ही बहुचर्चित सेलिब्रिटी जोडी 'कपल गोल्स' देत आहे हे खरं.