महाराष्ट्रात Biparjoy Cyclone मुळे Yellow Alert जारी! पण यलो अलर्टचा अर्थ काय?

Biparjoy Cyclone What is Red Yellow And Orange Alert: बिपरजॉय चक्रीवादळाच्या (Cyclone Biporjoy) पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र यलो अलर्ट म्हणजे काय? या अलर्टचा अर्थ काय होतो? हा अलर्ट जारी केल्याने सर्वसामान्यांवर काय परिणा होणार? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न...

| Jun 12, 2023, 11:22 AM IST
1/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असलेलं बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biporjoy), मान्सूननच्या वाऱ्यांचा वेग आणि एकंदर परिस्थितीनुसार महाराष्ट्रातील काही भागांना यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

2/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

पुढच्या चार ते पाच दिवसांत अर्थात 15 - 16 जूनपर्यंत राज्यातील बऱ्याच भागांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांना पुढील 2 दिवसांसाठी यलो अलर्टही देण्यात आल्याचं हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र यलो अलर्ट म्हणजे काय? रेड अलर्ट काय असतो? यलो अलर्ट जारी केला म्हणजे त्याचा सर्वसमान्यांवर काय परिणाम होणार?

3/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस अलर्ट जारी केले जातात. सामान्यपणे अतिवृष्टी, भूकंप, महापूर, त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रशासनाकडून सतर्कतेचा म्हणजेच अलर्टचा दिला जातो.

4/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

परिस्थिती कशी आहे यावर कोणता अलर्ट जारी करायचा हे ठरवलं जातं. यामध्ये ग्रीन, यलो, रेड आणि ऑरेंज अलर्टचा समावेश होतो. 

5/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

पण वेगवेगळ्या रंगांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्टचा नेमका अर्थ काय होतो? कोणत्या प्रकारच्या नैसर्गिक संकटावेळी कोणता अलर्ट दिला जातो? अमुक एक अलर्ट जारी केल्यानंतर काय करावं यासंदर्भातील सविस्तरम ाहिती जाणून घेऊयात... ​

6/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

ग्रीन अलर्ट – सिग्लन यंत्रणेप्रमाणेच येथेही ग्रीनचा अर्थ कोणताही धोका नाही असा होतो. वादळी किंवा नैसर्गिक संकटाची स्थिती असली तरी सर्व काही सुरळीत असल्याचं या अलर्टमधून दर्शवलं जातं. सर्व काही ठीक आहे असं सांगण्यासाठी ग्रीन अलर्ट असतो. सामान्य परिस्थितीमध्ये जेव्हा यल्लो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट दिल्यानंतर तो मागे घेताना ग्रीन अलर्टचा वापर केला जातो.

7/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

यलो अलर्ट – यलो अलर्टचा अर्थ पुढील काही दिवसांमध्ये हवामान बदल झाल्याने नैसर्गिक संकट ओढवू शकतं असं दर्शवण्यासाठी यलो अलर्ट जारी केला जातो.

8/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

आगामी काही दिवसांमध्ये रोजच्या कामाकाजामध्ये अडथळे येऊ शकतात असा यलो अलर्टचा सर्वसमान्यांसाठी अर्थ असतो. त्यामुळेच यलो अलर्टच्या कालावधीमध्ये सावधान राहण्याचा इशारा यंत्रणांकडून दिला जातो.

9/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

ऑरेंज अलर्ट – कोणत्याही क्षणी नैसर्गिक संकट येऊ शकतं हे दर्शवण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला जातो. नागरिकांनी येणाऱ्या नैसर्गिक संकटासाठी तयार रहावे असा या अलर्टचा अर्थ असतो. हा अलर्ट असताना यल्लो अलर्टपेक्षा जास्त चिंताजनक परिस्थिती असते. या कालावधीत लाईट जाणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात.

10/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर सामान्यपणे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असा सल्ला प्रशासनाकडून दिला जातो. आगामी मोठ्या संकटाची चाहूल लागल्यानंतर ऑरेंज अलर्ट जारी केला जातो.

11/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

रेड अलर्ट – आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात दिला जाणारा सर्वात गंभीर अलर्ट हा रेड अलर्ट असतो. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर किंवा येण्याच्या काही काळ आधी मर्यादीत भागासाठी म्हणजेच शहर, राज्य किंवा तालुका अथवा जिल्ह्यांसाठी हे अलर्ट जारी केले जातात. 

12/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

रेड अलर्ट जारी केल्यानंतर सर्वसामान्यांनी स्वत:बरोबर आजूबाजूच्यांच्या जिविताची काळजी घेणं अपेक्षित असतं. धोकादायक अथवा हानी होऊ शकते अशा ठिकाणी लोकांनी रेड अलर्टदरम्यान जाऊ नये असं यामधून निर्देशित केलं जातं.

13/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

मोठ्याप्रमाणात आर्थिक हानी आणि पडझड होण्याची शक्यता असेल तेव्हाच रेड अलर्ट जारी केला जातो. रेड अलर्ट जारी केल्यानंतर स्थानिक प्रशासनाबरोबरच त्या ठराविक भागांमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देण्यासाठी अधिक सक्रीय होतात.  

14/14

Biparjoy Cyclone What is red yellow and orange alert

नैसर्गिक आपत्ती अधिक धोकादायक आणि घातक ठरु शकते अशी परिस्थिती निर्माण होतो, सर्वसामान्यपणे चालणारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता असते तेव्हाच रेड अलर्ट दिला जातो.