भोजपुरी सिनेमात सपना चौधरीचे ठुमके

Jan 22, 2018, 22:39 PM IST
1/6

हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगणा सपना चौधरी बिग बॉसच्या घरात पहायला मिळाली. बिग बॉसच्या या सीजनमध्ये प्रेक्षकांनी तिला चांगलं पसंद केलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सपनाच्या फॉलोअर्सची संख्याही वाढत आहे.

2/6

अभिनेता अभय देओलसोबत सपना चौधरी बॉलिवूड सिनेमात पदार्पण करत आहे. तर, दुसरीकडे भोजपुरी सिनेमातही आयटम डान्स करताना पहायला मिळणार आहे.

3/6

सपना चौधरीने नुकतेच या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं आहे आणि हा सिनेमा याच वर्षात प्रदर्शित होणार आहे.

4/6

शूटिंगनंतर सपनाने तेथे उपस्थित आपल्या चाहत्यांसोबत फोटो क्लिक केले.

5/6

आमची सहयोगी वेबसाईट बॉलिवूडलाइफ.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेमाचं शूटिंग उत्तर प्रदेशातील भदोही, वाराणसी आणि मिर्झापूर येथे होणार आहे. या सिनेमात रवी किशनसोबतच सुधीर शर्मा, आशिष सिंह आणि संजय पांडे मुख्य भूमिकेत असणार आहेत.

6/6

या सिनेमाचा पहिला पार्ट १९९२मध्ये प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांनी पसंदही केलं होतं. (फोटो सौजन्य: बॉलीवुडलाइफ.कॉम)