दहशतवादी संघटना 'गजनवी फोर्स' बाबत मोठा खुलासा, जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट

Feb 25, 2021, 14:39 PM IST
1/5

नुकताच स्थापन झालेला दहशतवादी गट 'गजनवी फोर्स' (Ghaznavi Force) जम्मू-काश्मीरमधील धार्मिक स्थळांवर तसेच उजव्या विचारांच्या नेत्यांवर हल्ला करण्याचा विचार करीत आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने नाव बदलून आता 'गजनवी फोर्स' असं ठेवलं आहे.

2/5

गुप्तचर विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार या दहशतवादी गटाचा उद्देश देशात दंगल पसरवण्याचा आहे. जैश-ए-मोहम्मदनेच आपलं नाव बदलून 'गजनवी फोर्स'  ठेवले असल्याचं समोर आलं आहे.

3/5

पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव टाळण्यासाठी पाकिस्तान आयएसआयने जैशच्या मदतीने गजनवी फोर्स नावाचा एक नवीन दहशतवादी गट तयार केला आहे. ज्यांचा उद्देश हा धार्मिक स्थळे आणि नेत्यांना लक्ष्य करण्याचा आहे.

4/5

गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार गजनवी फोर्स ग्रेनेडच्या माध्यमातून धार्मिक स्थळांवर तसेच उजव्या विचारसरणीच्या नेत्यांवर मोठे हल्ले करण्याची तयारी करीत आहे. या अहवालानंतर सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषत: जम्मूमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत.

5/5

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर शांतता प्रस्थापित होत आहे. पण पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.