Bharat Jodo Yatra : दिल तो बच्चा है जी! काश्मिरच्या बर्फात राहुल-प्रियांका यांनी अनुभवलं रम्य बालपण पाहा PHOTO

Bharat Jodo Yatra च्या निमित्तानं पुन्हा एकदा राहुल गांधी आणि बहीण प्रियंका गांधी यांच्या नात्याची अनोखी आणि काहीशी खोडकर बाजू सर्वांनाच पाहायला मिळाली आहे. 

Jan 30, 2023, 15:46 PM IST

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण, प्रियंका गांधी यांच्या नात्याचे बंध आजवर अनेकांनीच पाहिले आहेत. त्याची बरीच चर्चाही झालीये. 

1/5

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : Watch Photo of Rahul Gandhi and Priyanka Gandhi Enjoy Snowfall in Kashmir Remember Childhood

आपण कितीही मोठे झालो, कितीही प्रसिद्ध असलो तरीही भावंडांसाठी आपण कायमच लहान असतो. हेच राहुल आणि प्रियंका गांधी यांचे काश्मीरमधील फोटो पाहून लक्षात येत आहे. 

2/5

Rahul gandhi enjoys Kashmir snow with sister Priyanka Gandhi

Bharat Jodo Yatra : Watch Photo of Rahul Gandhi and Priyanka Gandhi Enjoy Snowfall in Kashmir Remember Childhood

काँग्रेसच्या श्रीनगर येथील मुख्यालयापाशी होत असणाऱ्या बर्फवृष्टीचा आनंद घेत राहुल गांधी यांनी एखाद्या खोडकर मुलाप्रमाणं आपल्या बहिणीवर भुसभुशीत बर्फाचा मारा केला.   

3/5

Rahul gandhi enjoys Kashmir snow

Bharat Jodo Yatra : Watch Photo of Rahul Gandhi and Priyanka Gandhi Enjoy Snowfall in Kashmir Remember Childhood

जवळपास 4000 किमीचा प्रवास करून भारताच्या दक्षिण टोकापासून भारत जोडो यात्रेसह राहुल गांधी काश्मीरपर्यंत पोहोचले. इथंच त्यांच्या यात्रेची सांगताही झाली

4/5

Rahul gandhi

Bharat Jodo Yatra : Watch Photo of Rahul Gandhi and Priyanka Gandhi Enjoy Snowfall in Kashmir Remember Childhood

एकिकडे या यात्रेचे व्हिडीओ आणि फोटो चर्चेत असतानाच त्यादरम्यान होणाऱ्या सर्व राजकीय चर्चांना शह दिला तो म्हणजे या कमाल फोटोंनी. जिथं देशातील दोन महत्त्वाचे नेते, हिमवृष्टीचा आनंद घेताना दिसले. 

5/5

Bharat Jodo Yatra : Watch Photo of Rahul Gandhi and Priyanka Gandhi Enjoy Snowfall in Kashmir Remember Childhood

त्या दोघांकडे पाहून अनेकांनाच आपलं बालपण आठवलं असणार यात वाद नाही.