'Bhabi Ji Ghar Par Hain' चे कलाकार घेतात इतके पैसे; आकडा ऐकूण थक्क व्हाल

या शोला मनोरंजक बनवण्यात केवळ मुख्य स्टारकास्टचाच हात नाही, तर या मालिकेशी संबंधित प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केलं आहे.

Jul 07, 2022, 21:19 PM IST

Bhabi Ji Ghar Par Hain Cast Fees : 'भाबी जी घर पर हैं' (Bhabi ji Ghar Par Hain) अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. या शोला मनोरंजक बनवण्यात केवळ मुख्य स्टारकास्टचाच हात नाही, तर या मालिकेशी संबंधित प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केलं आहे. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला या मालिकेतल्या संपूर्ण स्टारकास्टच्या फीची माहिती सांगणार आहोत.

 

1/5

'भाबीजी घर पर है'मध्ये 'विभूती नारायण मिश्रा'ची भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ शेख लोकांना खूप आवडतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आसिफ मालिकेमधील त्याच्या भूमिकेसाठी प्रत्येक एपिसोडसाठी 70,000 रुपये इतकी भरीव फी घेतो.

2/5

या मालिकेमध्ये 'मनमोहन तिवारी' ची भूमिका साकारणारा अभिनेता रोहितेश गौर हा मालिकेच्या सुरुवातीपासूनच या मालिकेचा एक भाग आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहितश त्याच्या भूमिकेसाठी निर्मात्यांकडून 60 हजार रुपये प्रति एपिसोड फी घेतो.

3/5

मालिकेमध्ये 'मनमोहन तिवारी'ची साधी पत्नी 'अंगूरी भाभी'ची भूमिका करणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेही कमी फी घेत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती प्रत्येक एपिसोडसाठी 40 हजार रुपये घेते.

4/5

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'भाबीजी घर पर है'मध्ये 'अनोखेलाल सक्सेना' उर्फ ​​'सक्सेना जी'ची भूमिका साकारणारा अभिनेता सानंद वर्मा प्रत्येक एपिसोडसाठी निर्मात्यांकडून 25-30 हजार रुपये घेतो.

5/5

मालिकेतील 'टिल्लू', 'टिका' आणि 'मलखान'बद्दल बोलायचं झालं तर, ज्यांनी आपल्या कॉमिक टायमिंगने मालिकेमध्ये भर टाकली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या तिघांना प्रत्येक एपिसोडसाठी 20-25 हजार रुपये मिळतात.