स्वस्तात मस्त बाईक्स! 1 लीटर पेट्रोलमध्ये तब्बल 75 किमी पळवा

Best Mileage Bikes: आजही 100-125 सीसीच्या बाईक बाजारात सर्वाधिक विकल्या जातात. या बाइक्सना चांगले मायलेज देतात. यांना देखभाल आणि विम्यासाठी खूप कमी खर्च लागतो.

| Oct 15, 2023, 12:05 PM IST

Best Mileage Bikes:तुम्ही स्वत:साठी उत्तम मायलेज आणि कमी खर्चिक बाईक शोधत असाल तर काही पर्याय जाणून घ्या. यामध्ये कमी खर्चात तुम्हाला 75 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळेल.

1/9

स्वस्तात मस्त बाईक्स! 1 लीटर पेट्रोलमध्ये तब्बल 75 किमी पळवा

Best mileage bikes in india Low Maintenance two wheelers Marathi News

Best Mileage And Low Maintenance Bikes: बहुतांशजण बाईक घेताना जास्त मायलेज आणि कमी मेंटेनन्स असलेल्या बाइक्सच्या शोधात असतात. त्यामुळे आजही 100-125 सीसीच्या बाईक बाजारात सर्वाधिक विकल्या जातात. या बाइक्सना चांगले मायलेज देतात. यांना देखभाल आणि विम्यासाठी खूप कमी खर्च लागतो.

2/9

कमी खर्च

Best mileage bikes in india Low Maintenance two wheelers Marathi News

तुम्ही स्वत:साठी उत्तम मायलेज आणि कमी खर्चिक बाईक शोधत असाल तर काही पर्याय जाणून घ्या. यामध्ये कमी खर्चात तुम्हाला 75 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळेल. 

3/9

हिरो एचएफ ड्यूलेक्स

Best mileage bikes in india Low Maintenance two wheelers Marathi News

हिरो एचएफ ड्यूलेक्सही कंपनीच्या लाइनअपमधील सर्वोत्तम मायलेज बाइक आहे. हिरो एचएफ ड्यूलेक्स मध्ये 97.2 cc एअर कूल्ड इंजिन आहे जे 5.9 kW पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते.  यामध्ये किक आणि सेल्फ स्टार्टचा पर्याय मिळतो. या बाईकमध्ये कंपनीचे इंधन बचत तंत्रज्ञान i3S देखील आहे.

4/9

बाईकचे 4 प्रकार

Best mileage bikes in india Low Maintenance two wheelers Marathi News

Hero HF Deluxe चार प्रकारांमध्ये विकली जात आहे. त्याची किंमत 62 हजार 862 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 70,012 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते. या बाईकमध्ये 9.5 लीटरची इंधन टाकी आणि अॅक्सेसरीज म्हणून USB मोबाइल चार्जर देखील आहे. या बाइकमध्ये तुम्हाला 60-65 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज मिळेल.

5/9

बजाज प्लॅटिना 100

Best mileage bikes in india Low Maintenance two wheelers Marathi News

बजाज प्लॅटिना 100 बऱ्याच काळापासून बाजारात विकली जात आहे. प्लॅटीना 100 मध्ये 102cc इंधन कार्यक्षम DTS-i इंजिन आहे जे 7.9 bhp पॉवर आणि 8.3 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याची इंधन टाकीची क्षमता 11 लीटर आहे.

6/9

देशातील एकमेव 110 सीसी बाईक

Best mileage bikes in india Low Maintenance two wheelers Marathi News

बजाज प्लॅटिना 100 ची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 67 हजार 808 रुपयांपासून सुरू होते. तर त्याच्या 110 सीसी ड्रम ब्रेक प्रकाराची किंमत 70,400 रुपये आहे. बजाज प्लॅटिना ही देशातील एकमेव 110 सीसी बाईक आहे ज्यामध्ये कंपनीने ABS सारखे महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स दिले आहेत. Platina 100 मध्ये 65-70 किलोमीटरची रेंज मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

7/9

टीव्हीस स्टार स्पोर्ट्स

Best mileage bikes in india Low Maintenance two wheelers Marathi News

TVS Star Sport ही भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम मायलेज देणारी बाईक आहे. यात 110cc फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे. यामध्ये 6.03 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट होते. ही बाईक अद्ययावत BS-6 फेज-2 नियमांचे पालन करते आणि E20 इंधनावरही चालते. यात 4-स्पीड गिअरबॉक्स आहे. त्याचा टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटर आहे.

8/9

75 किलोमीटरचे मायलेज

Best mileage bikes in india Low Maintenance two wheelers Marathi News

स्टार स्पोर्ट बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये 75 किलोमीटरचे मायलेज सहज देऊ शकते. कंपनीने या बाईकमध्ये Ecothrust Fuel Injection (ET-Fi) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे बाईक उत्तम मायलेज देऊ शकली आहे. 

9/9

बाईकचे 2 प्रकार

Best mileage bikes in india Low Maintenance two wheelers Marathi News

टीव्हीएस स्टार स्पोर्ट्स ES आणि ELS या दोन प्रकारांमध्ये विकली जात आहे. त्यांच्या एक्स-शोरूम, दिल्लीच्या किमती अनुक्रमे 59 हजार 431 रुपये आणि 70 हजार 773 रुपये आहेत.