तोंड वाकडं न करता सलग एक महिना खा मूड आलेले मूग; शरीरात दिसतील 6 आश्चर्यकारक बदल, वजन झटक्यात होईल कमी

मोड आलेले मूग आपल्या डाएटमध्ये समाविष्य करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जर तुम्ही एक महिना दररोज मोड आलेल्या मुगाचं सेवन केलं तर शरीराला अनेक फायदे मिळतात. न्यूट्रिशनिस्ट्सच्या मते मोड आलेल्या मूगमध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराच्या अनेक अवयवांचे कार्य सुधारते आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत होते. हे 6 फायदे नेमके कोणते आहेत हे जाणून घ्या.  

| Oct 26, 2024, 19:53 PM IST

1/9

2/9

रोज सकाळी याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे शरीरातील चांगले बॅक्टेरिया देखील राखते, ज्यामुळे पचन सुधारते.  

3/9

मोड आलेल्या मूगमध्ये कॅलरी कमी आणि फायबर भरपूर असते, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि भूक कमी होते. याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील ऊर्जैची पातळीही टिकून राहते.  

4/9

मोड आलेल्या मूगमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोहासारखे पोषक घटक असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. याचे रोज सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजार दूर राहतात.  

5/9

मोड आलेल्या मुगात अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.   

6/9

यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी केसांची वाढ करतात आणि त्यांना मजबूत बनवतात.  

7/9

मोड आलेल्या मूगमध्ये पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रित करते आणि हृदयाच्या नसांमध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करते. हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.  

8/9

मोड आलेल्या मूगमध्ये असलेले प्रोटीन आणि फायबर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.   

9/9

याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते, कारण ते साखरेची पातळी वेगाने वाढण्यापासून रोखते.