PHOTO : 'या' विशाल मंदिरात वसलंय अख्ख शहर, अयोध्येला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी इथे करणार पूजा

Ranganathaswamy Temple Photos : येत्या 22 जानेवारी सोमवारी राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी विशेष विधी करत आहे. या विधीतर्गंत मोदी 20 जानेवारीला श्री रंगनाथस्वामी मंदिराला भेट देणार आहे. 

Jan 19, 2024, 15:44 PM IST
1/7

पंतप्रधान मोदी दक्षिण भारतातील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पूजा अर्चा करणार आहेत. हे मंदिर खूप मोठं असून 156 एकरात पसरलेल आहे. भगवान विष्णूला समर्पित असलेल्या या मंदिरात मूर्तीपासून ते मंदिराची विशालता, सौंदर्य, भव्यता सर्वांना आकर्षित करतं. 

2/7

श्री रंगनाथस्वामी मंदिर हे एक प्राचीन मंदिर असून ते 631,000 मीटर स्क्वेअरमध्ये वसलेलं आहे. या मंदिराच्या परिसरात संपूर्ण शहर वसलेलंय असं म्हणतात. खरं तर, मंदिराच्या प्रांगणात फक्त हॉटेल्स आणि सामान्य दुकानेच नाहीत तर संपूर्ण निवासी जागा, मोठा बाजार इत्यादी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. 

3/7

या मंदिरात 49 धार्मिक स्थळं बांधलेली आहेत, जी भगवान विष्णूला समर्पित करण्यात आली आहे. भगवान विष्णूंना दक्षिणेला श्री रंगनाथ स्वामी म्हणतात. श्री रंगनाथस्वामी मंदिर या प्रसिद्ध मंदिरात भगवान विष्णूची एक मोठी मूर्ती आहे ज्यात शेषनाग त्याच्या पलंगावर विराजमान आहे. 

4/7

या मंदिराची रचना तमिळ शैलीवर आधारित आहे. हे मंदिर 21 गोपुरम आणि 1000 खांबांवर वसलेलं आहे. मात्र, आता त्याचे केवळ 953 खांबच आपल्याला दिसतात. हे प्राचीन मंदिर विजयनगर काळात (1336-1565) ग्रॅनाइट दगडांनी बांधलं गेलंय. 

5/7

श्री रंगनाथस्वामी मंदिर हे भारतातील सर्वात उंच मंदिर आहे. या मंदिरात प्रदीर्घ काळ प्रभू रामाची पूजा केल्याचं सांगितलं जातं. रावणाचा वध केल्यानंतर प्रभू राम लंका विभीषणाच्या ताब्यात देऊन परतत असताना येथेच भगवान विष्णूंनी रामाच्या वाटेवर दर्शन घेतल्याची आख्यायिका आहे.  

6/7

हे मंदिर अत्यंत विशाल अशा 7 भागांत विभागलं गेलंय. सातही भागांभोवती उंच आणि जाडजूड भिंतीचं संरक्षण पाहिला मिळतं. श्रीरंगनाथ स्वामी मंदिराच्या 7 भागांपैकी 4 भाग मंदिरानी व्यापलं आहे. उर्वरीत तीन भागांत भाविक आणि पर्यटकासाठी सोय करण्यात आली आहे. 

7/7

या मंदिरात वैकुंठ एकादशी चा 20 दिवस चालणारा महोत्सव सर्वांत मोठा उत्सव असून यावेळी लाखो भाविक इथे येतात. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)