अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी 'या' अभिनेत्यांशी ऐश्वर्याचे नाव जोडले गेले होते

सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्या राय आणि अभिनेषक बच्चन खूप चर्चेत आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा देखील सुरु आहेत. 

Soneshwar Patil | Sep 26, 2024, 12:33 PM IST
1/7

2007 मध्ये लग्न

ऐश्वर्या आणि अभिषेकची प्रेमकहाणी चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती. त्यानंतर दोघांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केलं. 

2/7

अफेअरच्या अफवा

ऐश्वर्या रायसोबत लग्न करण्यापूर्वी अभिषेकची करिश्मा कपूरसोबतची एंगेजमेंट तुटली होती. त्यावेळी ऐश्वर्याचे अनेक अभिनेत्यांशी अफेअर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. 

3/7

सेटवर प्रेमकहाणी

ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या अफेअरबद्दल सर्वांनाच माहिती आहे. 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर दोघांची प्रेमकहाणी सुरु झाली होती. 

4/7

ब्रेकअप

रिपोर्टनुसार, सलमान खान ऐश्वर्याबद्दल खूप सकारात्मक होता. त्यामुळेच ऐश्वर्या सलमान खानपासून वेगळी झाली होती.   

5/7

विवेक ओबेरॉय

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याच्या विवेकसोबत अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या. एका चित्रपटाच्या सेटवर दोघांची जवळीक वाढली होती. 

6/7

सलमान-विवेक भांडण

सलमान आणि विवेकच्या भांडणामुळे ऐश्वर्या आणि विवेकचे नाते तुटले. रिपोर्टनुसार, सलमानने विवेकला खूप धमक्या दिल्या होत्या. 

7/7

राजीव मूलचंदानी

रिपोर्टनुसार, ऐश्वर्या सिनेसृष्टीत येण्यापूर्वी राजीव मूलचंदानीला डेट करत होती. मनीषा कोईराला यांच्यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे.