बीट खात असाल तर वेळीच व्हा सावध! जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Beetroot Side Effects : बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण बीटचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या व्यक्तींनी बीट खावू नयेत. 

Jan 09, 2024, 15:44 PM IST

Beetroot Side Effects news in Marathi : हिवाळा सुरु झाला की अनेकजण बीट खाण्याचा सल्ला देतात. बीटमध्ये असलेले पोषकतत्व घटक त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतात. हिवाळ्यात आहारात बीटाचा समावेश केला जातो. पण बीटचे काही तोटे देखील आहेत. बीट खाण्याचे आरोग्यावर काय परिणाम होतील ते जाणून घ्या... 

1/7

बीटमध्ये तांबे, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम असते. म्हणूनच ही खनिजे यकृतामध्ये जास्त प्रमाणात जमा होऊ लागतात आणि त्याला हानी पोहोचवू शकतात.

2/7

बीटरूटमध्ये नायट्रेट्स असतात. शरीरात नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असेल तर पोटात क्रॅम्प होऊ शकतो. याच्या रसामुळे काही लोकांचे पोट खराब होऊ शकते. आणि पचनाच्या समस्या असू शकतात. नायट्रेट्समुळे, गर्भवती महिलांना बीटरूटचे सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला दिला जातो.

3/7

पचन संबधित समस्या

बीटचे सेवन केल्याने पोटाशी संबधित समस्या उद्भवू शकतात. गर्भवती महिलांनी बीट कमी प्रमाणात सेवन करावे. कारण यकृतालाही बीटचे अधिक सेवन धोकादायक ठरु शकते.   

4/7

ऍलर्जी

बीट खाल्ल्यानंतर काहींना त्वचेवर पुरळ उठणे, पित्ताशयात खडे येणे, खाज येणे, थंडी वाजून येणे आणि ताप येणे यासारख्या त्रास सुरु होतो. त्यामुळे तुम्हाला बीटची अशी  कोणतीही ऍलर्जी वाटत असेल तर त्याचे सेवन करु नका.   

5/7

मधुमेह

बीट खाल्लाने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मज्जातंतूंना इजा होण्याचा धोका असतो. बीटचा रस पिल्याने शरीरातील फायबर कमी होते आणि ग्लायसेमिक लोड वाढतो. 

6/7

स्टोन

किडनी स्टोनमध्येही बीटचे सेवन हानिकारक मानले जाते.  कारण किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी बीटचे सेवन करु नयेत. 

7/7

कमी रक्तदाब

तुम्हाला जर कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर बीट खाणे धोक्याचे ठरु शकतील. कारण बीटमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्था नायट्रिक ऑक्साईडमध्ये बदलत. नायट्रिक ऑक्साईज शरीरातील रक्त पातळ करते.