अलर्ट! 'या' सरकारी बँकेचं Debit Card बंद होणार; आता पैसे काढायचे कसे?

Debit Card : दैनंदिन जीवनात बँकेत जाऊन पैसे काढण्याला आजकाल तुलनेनं कमी प्राधान्य मिळत नसून, एटीएम मशीनमधूनच पैसे काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 

Oct 09, 2023, 10:36 AM IST

Debit Card : रोजच्या आयुष्यात अनेकदा बँकांच्या व्यवहारांशिवाय काही गोष्टी पुढेच जात नाहीत. यामध्ये बँकेत पैशांची बचत करणं, पैसे काढणं वगैरे वगैरे गोष्टींचा समावेश आहे. 

 

1/7

Bank of India customers update debit card latest news

Debit Card : हल्ली बँकेत जाऊन पैसे काढण्याला आजकाल तुलनेनं कमी प्राधान्य मिळत नसून, एटीएम मशीनमधूनच पैसे काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 

2/7

बातमी चिंता वाढवणारी

Bank of India customers update debit card latest news

Bank Debit Card ATM : ही बातमी चिंता वाढवणारी. कारण, तुम्हीही बँक ऑफ इंडिया (Bank of India) या सरकारी बँकेचे खातेधाक असाल आणि त्यांचं डेबिट कार्ड वापरत असाल तर ही माहिती पाहाच.   

3/7

डेबिट कार्ड बंद

Bank of India customers update debit card latest news

31 ऑक्टोबरनंतर (BOI) बँक ऑफ इंडियाचं डेबिट कार्ड बंद होणार आहे. त्यामुळं तुम्हाला एटीएमधून पैसे काढता येणार नाहीत आणि कोणतेही आर्थिकत व्यवहारही करता येणार नाहीत.   

4/7

बंधनकारक

Bank of India customers update debit card latest news

बँक ऑफ इंडियानं ट्विट करतच याबाबतची माहिती दिली. जिथं खातेधारकांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार डेबिट कार्डच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी वैध दूरध्वनी/ मोबाईल क्रमांक असणं बंधनकारक करण्यात आल्याचं सांगितलं गेलं.   

5/7

कार्ड सेवा बंद न होण्यासाठी...

Bank of India customers update debit card latest news

डेबिट कार्ड सेवा बंद न होण्यासाठी कार्धारकांनी नजीकच्या बँक शाखेत जाऊन मोबाईल क्रमांक अपडेट / रजिस्टर करून घ्यावा असं आवाहन बँकेकडून करण्यात आलं.   

6/7

मोबईल क्रमांड अपडेट

Bank of India customers update debit card latest news

ऑनलाईन पद्धतीनं ATM च्या माध्यमातून मोबईल क्रमांड अपडेट करता येत नसेल तरीसुद्धा खातेधारकांनी बँकेशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे. 

7/7

एक फॉर्म भरणं अपेक्षित असेल

Bank of India customers update debit card latest news

बँकेत गेलं असता तिथं तुम्ही एक फॉर्म भरणं अपेक्षित असेल. जिथं तुमच्या माहितीचा सविस्तर तपशील असेल. शिवाय सोबत पासबुक आणि आधार कार्डची प्रतही जोडावी लागणार आहे. ज्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होईल.