'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील सोनू अडकली विवाहबंधनात, दोघेही झाले भावूक

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम झील मेहताने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल.

| Jan 01, 2025, 12:41 PM IST
1/7

झील मेहता लग्न

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही लोकप्रिय मालिका नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आता या मालिकेतील सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता हिने लग्न केलं आहे.

2/7

व्हिडीओ शेअर

अभिनेत्रीने 28 डिसेंबर रोजी आदित्य दुबे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. नुकताच झील मेहताने तिच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

3/7

कमेंट्सचा वर्षाव

झीलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये वधूच्या रुपात खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचे चाहते तिच्या फोटोंवर आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

4/7

व्हिडीओ व्हायरल

तर आदित्य दुबेने शेरवानी घातली होती. एकमेकांना पुष्पहार घालताना दोघेही भावूक झाले होते. सध्या दोघांचा लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

5/7

अभिनयापासून दूर

अभिनेत्री झील मेहताने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत सोनूची व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती. परंतु, सध्या ती अभिनयापासून दूर आहे.

6/7

मेकअप आर्टिस्ट

सध्या झील मेहता मेकअप आर्टिस्ट बनली असून पुढे ती यामध्येच तिचं करिअर घडवणार असल्याचं म्हटले जात आहे. 

7/7

अनेक वर्षे डेट

झील आणि आदित्य 14 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्षे डेट केल्यानंतर आता दोघांनी लग्न केलं आहे. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.