'खेल खेल में' आपटला: स्वतःची फी निघेना एवढा फ्लॉप ठरतोय अक्षय कुमार!

Akshay Kumar Movie Collection : मागील अनेक चित्रपट पाहता अक्षय कुमारच्या चित्रपटांची बॉक्सऑफिस वरील कमाई फारशी होताना दिसत नाही. काही चित्रपट तर इतके फ्लॉप झाले की अक्षय कुमारच्या फीपेक्षा ही कमी कमाई झाली. 

Aug 17, 2024, 17:28 PM IST

अक्षय कुमारच्या चित्रपटांची कमाई -
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे मागील काही चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलेच पडलेत. एवढंच काय तर गेल्या दोन वर्षात अर्धा डजन चित्रपटांची कमाई त्यांच्या फीपेक्षा ही कमी झालीये. आता अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हा  चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय त्यालाही काही खास प्रतिसाद मिळाला नाही. आता हा चित्रपट तरी अक्षय कुमारच्या फीपेक्षा जास्त कमाई करू शकतो का हे बघण्या सारखे आहे. चला जाणून घेऊया असे कोणते चित्रपट आहेत ज्यांनी अक्षय कुमारच्या फीपेक्षा ही कमी कमाई केली आहे.

1/7

सरफिरा

अक्षय कुमारचा 'सरफिरा' हा चित्रपट १२ जुलै ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने २२.१३ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटासाठी अक्षय कुमारने २७ करोड रूपये फी घेतली होती. 

2/7

बडे मियां छोटे मियां

अक्षय कुमारचा चित्रपट 'बडे मियां छोटे मियां' ११ एप्रिलला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने ५९.१७ कोटी रूपये कमावले होते. तर अक्षय कुमारने या चित्रपटासाठी १६५ कोटी रूपये घेतले होते.

3/7

मिशन रानीगंज

२०२३ मध्ये अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याने ३३.७४ कोटींची कमाई केली होती. 'मिशन रानीगंज' अक्षय कुमारने ११० कोटी रूपये फी घेतली होती. 

4/7

सेल्फी

'सेल्फी' हा अक्षय कुमारचा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने १६.८५ कोटी कमावले होते. अक्षय कुमारने या चित्रपटासाठी ३५ कोटी रूपये घेतले होते.

5/7

रक्षाबंधन

२०२२ मध्ये अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने ४४.३९ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर या चित्रपटासाठी अक्षय कुमारने ११० कोटी घेतले होते.

6/7

बच्चन पांडे

अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने ४९.९८ कोटींची कमाई केली होती. 'बच्चन पांडे' चित्रपटासाठी अक्षय कुमारने ९९ कोटी फी घेतली होती.

7/7

'खेल खेल में'

अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.२३ कोटींची कमाई केली. तर आता पर्यंत ६० करोड कमाई झाली आहे. यापुढे आता हा चित्रपट किती कमाई करणार हे बघण्यासारखे ठरणार आहे.