PAK Vs AFG: दारूण पराभवानंतर बाबर आझमने केलं असं की...; कृत्याची होतेय चर्चा

PAK Vs AFG: पाकिस्तान क्रिकेट टीमचा आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने 8 विकेट्सने पराभव केला आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमसह चाहतेही दुखावले गेले. मात्र, पराभवानंतरही बाबरने चाहत्यांची मने जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. 

Oct 24, 2023, 12:28 PM IST
1/5

बाबर आझम आणि रहमानउल्ला गुरबाज यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये दोन्ही क्रिकेटपटू बॅटसोबत पोज देताना दिसत आहेत.

2/5

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजला त्याची बॅट भेट दिली.

3/5

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते आता बाबरच्या या कृत्याचं कौतुक करतायत.

4/5

चाहत्यांचे म्हणण्यानुसार, सामना हरल्यानंतरही बाबरने अफगाणिस्तानच्या फलंदाजाला बॅटच्या रूपात त्याचं सर्वात मोठं शस्त्र दिलंय.  

5/5

गुरबाजला दिलेली ही तीच बॅट आहे, ज्याने बाबरने अनेक धावा केल्या आणि अनेक प्रसंगी पाकिस्तानला विजय मिळवून दिला.