Ayodhya Saryu Ghat : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली, शरयू तटावर आकर्षक रोषणाई!

Ram Mandir pran pratishtha Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन आलं आहे. त्यामुळे आता अयोध्येत दिवाळीप्रमाणे धामधूम दिसून येतीये. 

Saurabh Talekar | Jan 20, 2024, 21:15 PM IST

Ayodhya News : 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शरयूच्या तटवर 'श्री राम नाम महायज्ञ' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन आलंय. 

1/6

शरयू तटावर कार्यक्रमांचं आयोजन

अयोध्येतील प्रसिद्ध अशा शरयू तटावर मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. नदी किनाऱ्यावर डेकोरेशन केले जात आहेत. त्याचबरोबर साफसफाईची देखील पहायला मिळतेय.

2/6

फटाक्यांची आतषबाजी

22 जानेवारीला अभिषेक सोहळ्याच्या संध्याकाळी शरयू तटावर दिवाळी सारखा उत्सव आयोजित केला जाईल, जिथं दिव्यांच्या उत्सवासोबत सरयू काठावर फटाक्यांची आतषबाजीही केली जाईल.

3/6

पोलीस मार्गदर्शक

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भाविकांना प्रेक्षणीय स्थळांची माहिती देण्यासाठी 250 'पोलीस मार्गदर्शक' तैनात करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितलंय. 

4/6

शिवलिंगाची स्थापना

शरयू तटावर भव्य विधीसाठी 1008 नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. या कार्यक्रमात नेपाळमधील 21 हजार पंडित सहभागी होणार आहेत.

5/6

'टेंट सिटी'

राम मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सरयू नदीच्या घाटावर 100 एकर जागेवर 'टेंट सिटी' स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिलीये.

6/6

दिव्यांची रोषणाई

अयोध्यावासीयांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात म्हणून मंगळवारी संध्याकाळी सरयू तीरावर हजारो दिव्यांची रोषणाई करून साजरी केली होती. त्यामुळे आता 22 तारखेला मोठा उत्साह असेल, यात शंका नाही.