Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लानं केला कोणकोणच्या दागिन्यांचा साज? जाणून घ्या त्यांची नावं आणि महत्त्वं

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अनेक मान्यवर, साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीमध्ये रामलल्ला स्वगृही परतले, असेच भाव यावेळी सर्वांच्या मनात पाहायला मिळाले होते.   

Jan 23, 2024, 08:07 AM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : एकदोन नव्हे, तब्बल पाच शतकं अर्थात 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम जन्मभूमी म्हणून ख्याती असणाऱ्या अयोध्यानगरीमध्ये भव्य राम मंदिर उभं राहिलं आणि तिथंच रामलल्लाही विराजमान झाले. 

1/7

कृष्णशिळेतील मूर्ती

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Mandir Inauguration know how much gold did ramlalla wore

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : प्रख्यात मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या कृष्णशिळेतील मूर्तीची पहिली झलक सर्वांपुढे आली त्या क्षणापासून रामलल्लाच्या प्रथमदर्शनाची उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती. 

2/7

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Mandir Inauguration know how much gold did ramlalla wore

अखेर तो क्षण आला. 22 जानेवारी 2024 या दिवशी तयार झालेल्या अद्भूत अशा अवघ्या 48 सेकंदांच्या अभिजीत मुहूर्ताच्या क्षणी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा विधीवत पार पडली आणि देवाचं लोभस, करुणास्वरुप रुप जगापुढे आलं.   

3/7

दागिन्यांनी मढलेलं रुप

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Mandir Inauguration know how much gold did ramlalla wore

दागिन्यांनी मढलेले, हाती धनुष्य, पायाशी कमळपुष्प असणारे, सोबतीला मारुतीरायासुद्धा असणाऱ्या 5 वर्षांच्या रामलल्लाचं रुप अनेकांनीच यावेळी डोळ्यांमध्ये साठवलं. सोन्याच्या तारांचा वापर करून तयार करण्यात आलेलं बनारसी वस्त्राचं पितांबर त्यांच्यावर शोभून दिसत होतं. 

4/7

मुकूट आणि कर्णफुलं

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Mandir Inauguration know how much gold did ramlalla wore

रामलल्लाच्या शिरस्थानी असणाऱ्या मुकुटामध्ये माणिक, पन्ना आणि हिरे जडलेले आहेत. तर, मुकूटाच्या केंद्रस्थानी सूर्य आहे. देवाची कर्णफुलंही तितकीच आकर्षक असून, त्यामध्ये मोराची आकृती साकारण्यात आली आहे तर, रामलल्लाच्या गळ्यामध्ये अर्धचंद्राकार कंठीसुद्धा सुशोभित आहे. या कंठीखाली पन्न्याच्या लडीसुद्धा आहेत.   

5/7

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Mandir Inauguration know how much gold did ramlalla wore

देवाच्या हृदयापाशी एक कौस्तुभमणी असून तो हिरे- माणकांनी सजवला आहे. विष्णूच्या प्रत्येत अवतारामध्ये या कौस्तुभमणीचं महत्त्वं अगाध आहे. देवाच्या नाभीच्या वर एक पाचपजरी हार आहे. त्याखालोखाल लांबलचक वैजयंतीमाळ आहे. वैजयंती किंवा या विजयमाळेमध्ये अनेक माणकं आणि हिरे आहेत. ही माळ/ हार विजयाचं प्रतीक असून, त्यामध्ये वैष्णव परंपरेतील शंख, चक्र, मंगल कलश अशी प्रतीकं आहेत. यामध्ये कमळ, चाफा, पारिजात, कुंद आणि तुळस अशा भगवान विष्णूच्या प्रिय फुलांचीही प्रतीकं आहेत. 

6/7

बाजुबंद

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Mandir Inauguration know how much gold did ramlalla wore

देवाच्या कमरेवर हिरे आणि मोत्यांनी सजलेला कंबरपट्टा असून, त्यावर पाच लहान घंटा आहेत. ज्यातून पावित्र्याचे संकेत मिळतात. रामलल्लाच्या दोन्ही बाह्यांमध्ये बाजुबंद आणि हातांमध्ये रत्नजडित कंकणं आहेत. तर, पायांमध्ये पैंजणही आहेत. देवाच्या डाव्या हाती धनुष्य असून, त्यावर मोती, माणिकांची सजावट आहे. तर, उजव्या हातात सोन्याचा बाण आहे.   

7/7

देवाच्या खेळण्यासाठी...

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Mandir Inauguration know how much gold did ramlalla wore

देवाच्या गळ्यात एक वनमालाही आहे. तर, माथ्यावर हिरे- माणकांचा शुभसूचक टीळाही आहे. देव बालस्वरुपात इथं विराजमान असल्यामुळं त्यांच्यासमोर खेळण्यासाठी चांदीची खेळणी असून, त्यामध्ये खुळखुळा, हत्ती, घोडा, उंट आणि खेळण्यातील गाडी आहे. देवाला सोन्याचं छतही इथं पाहायला मिळतं.