PM मोदींनी समुद्रात केलेलं स्नान अन् अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा संबंध काय?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यामध्ये सहभागी होत असले तरी त्यांनी काल म्हणजेच रविवार, 21 जानेवारी 2024 रोजी दक्षिण भारतामध्ये चक्क समुद्रात स्थान केलं. मोदींनी अयोध्येतील सोहळ्याआधी समुद्रात मारलेली ही डुबकी फार महत्त्वाची मानली जात आहे. या स्नानाचे महत्त्व जाणून घेऊयात...

| Jan 22, 2024, 10:09 AM IST
1/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी अरिचल मुनईजवळील प्रभू राम मंदिरात पूजा केली. तसेच समुद्रामध्ये त्यांनी पवित्र स्नान केलं. या स्नानाला फार महत्त्व आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

2/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

दक्षिण भारतातील रामायणाशी संबंधित मंदिरांचा अध्यात्मिक प्रवास पंतप्रधान मोदींनी सोमवारी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणेच्या आधी पूर्ण केला.  

3/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

धनुषकोडीजवळील मंदिरात मोदींनी प्रार्थना केली आणि समुद्रकिनारी पुष्पांजली अर्पण केली.

4/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकापूर्वी मंदिरांना भेटी पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी धनुषकोडी आणि अरिचल मुनईच्या मार्गावर असलेल्या श्री कोठंडारामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.

5/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

श्री कोठंडारामस्वामी मंदिर असलेल्या किनाऱ्याजवळ मोदींनी ज्या ठिकाणी समुद्रात पुष्पांजली अर्पण केली तिथून श्रीलंका हाकेच्या अंतरावर आहे.

6/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

तामिळ भाषेत कोठंडारामस्वामी म्हणजे भगवान राम आणि धनुष्यबाण सूचित करतात.  

7/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

पंतप्रधानांनी अरिचल मुनई समुद्र किनाऱ्यावर आणि राष्ट्रीय चिन्ह असलेल्या स्तंभावर पुष्पांजली वाहिली. 

8/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

पंतप्रधानांनी सुमद्र किनाऱ्यावर 'प्राणायाम' केला आणि समुद्राच्या पाण्याचा वापर करुन प्रार्थना केली.

9/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

आठवड्याच्या सुरुवातीला मोदींनी आंध्र प्रदेश आणि केरळमधील मंदिरांमध्ये प्रार्थना केली होती.

10/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

शनिवारी रात्री रामेश्वर येथे मुक्काम करुन पंतप्रधान मोदी अरिचलम मुनई येथे राम सेतू बांधलेल्या ठिकाणी नतमस्तक झाले.  

11/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

कोठंडारामस्वामी मंदिर आणि अरिचल मुनईला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मदुराईला पोहोचले आणि तिथून विमानाने रविवारी रात्री दिल्लीत दाखल झाले.

12/12

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance

मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी आपल्याबरोबर तामिळनाडूतील पवित्र पाण्याचे कलश घेऊन गेले असून ते अयोध्येतील सोहळ्यासाठी वापरले जाणार आहेत.