रामलल्लाच्या मूर्तीवर दशावतार! राम 7 वा अवतार; इतर 10 अवतार कोणते? त्यांचं महत्त्व काय?

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu: अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये विराजमान होणारी रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक शुक्रवारीच समोर आली. या मूर्तीच्या प्रभावळीवर विष्णूचे दशावतार दिसून येतात. हे दशावतार कोणते त्यांचे महत्त्व काय जाणून घेऊयात...

| Jan 22, 2024, 09:21 AM IST
1/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रभावळीवर विष्णूचे दशावतार दिसून येत आहेत. हे दशावतार कोणते आणि त्यांचं महत्त्व काय पाहूयात...

2/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने 24 अवतार घेतले आहेत. त्यामधील 10 प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरूपात प्रसिद्ध आहेत.

3/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते.

4/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

एका असूराने ब्रम्हादेवकडून चार वेद चोरून महासगरात खोल लपवुन ठेवले. मस्याचा अवतार घेऊन त्यांनी असुराचा नाश केला अणि चारही वेद परत ब्रह्महा देवाला परत केले.

5/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

विष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार म्हणजे कूर्म अवतार. कूर्म अवताराला 'कच्छप अवतार' देखील म्हणतात. देव व दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागर समुद्रात समुद्रमंथन केले होते. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. त्यावेळी भगवान विष्णूनी कूर्मावतार घेतला.

6/22

कुर्मावताराच्या (कासवाच्या) रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. त्यामुळे देव आणि दानव सहजपणे समुद्र मंथन करू लागले. या समुद्रमंथनातून चौदा रत्ने मिळवले. कासव हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. कुर्मा जयंतीचा सण वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.

7/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते.

8/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

ज्या दिवशी विष्णूने वराह अवतार धारण केला त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती. त्यामुळे याच दिवशी वराह जयंती असते. या अवतारात विष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.

9/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते.

10/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला अशी आख्यायिका प्रचलित आहे.

11/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

वामन अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. मत्स्य, कूर्म, वराह आणि नृसिंह या अवतारांनंतर ब्राह्मण बाटु स्वरूपातला हा अवतार आहे. श्रीमद भागवत पुराणात यासंदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे.

12/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

भागवत पुराणातील वामन अवताराच्या कथेनुसार, देव व असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. अशाने राक्षसकुळ संपून जाईल, या भीतीने असुरांचे गुरू शुक्राचार्य आपल्याला अवगत असलेली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना पुन्हा जीवंत करतात. शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी मोठा यज्ञ करतात. बळीराजाला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत, विविध अद्भूत शक्ती मिळवून देतात. यानंतर असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते. असुरांचे सैन्य इंद्राची राजधानी अमरावतीवर हल्ल्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल, अशी इंद्राला भीती वाटू लागते. म्हणून इंद्र विष्णूंना शरण जातात. विष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात. महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी विष्णू बालकाच्या रूपात जन्म घेतात. महर्षी कश्यप आणि माता आदिती या बाळाचे 'वामन' असे नामकरण करतात. महर्षी कश्यप ऋषींसह वामनावर यज्ञोपवीत संस्कार करतात. वामन बटुला महर्षी पुलह यज्ञोपवीत, अगस्त्य ऋषी मृगचर्म, मरिची ऋषी पलाश दंड, अंगिरसा ऋषी वस्त्र, सूर्य छत्र, भृगु ऋषी खडावा, गुरू देवांनी कमंडळु, माता अदितीने कौपीनवस्त्र, सरस्वती देवी रुद्राक्षाची माळ आणि कुबेर भिक्षा पात्र देतात.

13/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित राजाचा नातू परशुराम हे ब्राम्हण कुळातील भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात.

14/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

परशुराम यांचा जन्म सम्राट प्रसेनजित राजाचा जावई ऋषी जमदग्नी व राजकन्या रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला.

15/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

भगवान राम किंवा श्रीराम हे एक हिंदू धर्मातील दैवत व भगवान नारायणांचे सातवे अवतार आहेत. वाल्मिकिंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे ते नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते.

16/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

श्री राम अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला. भगवान रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हटले जाते. प्रभु श्रीराम सत्यवचनी व एकपत्नीव्रत व परम दयाळू होते.

17/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

विष्णूचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथामधील सर्वोच्च देवता म्हणून कृष्णाची पूजा केली जाते. कृष्ण हा संरक्षण, करुणा, माया आणि प्रेमाचा देव असून तो भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय मानला जातो.

18/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

हिंदू लोक कृष्णाचा जन्मदिवस दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीला चंद्रसौर हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरा करतात. कृष्णाचा जन्मदिवस ऑगस्टच्या उत्तरार्धात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला येतो.

19/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार बुद्ध हे विष्णूच्या दशावतारातील नववे अवतार असल्याचे मानले जाते. तथापि याला बौद्ध धर्मात खोडसाळपणाचे लक्षण समजले जाते.

20/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

बुद्धांनी 'बौद्ध धर्माची' स्थापना केली. गौतम बुद्ध, शाक्यमूनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक सम्मासंबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये इ.स.पू. 563 मध्ये लुंबिनी येथे बुद्धांचा जन्म झाला.  राजकुमार म्हणून जन्माला आलेल्या बुद्धांचं नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते.

21/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

कल्की अवतार हा हिंदू धर्मातील देवता विष्णूचा दशावतारापैकी दहावा अवतार आणि भविष्यातील अवतार मानला जातो. वैष्णव ब्रह्मांडशास्त्रानुसार, हा अंतहीन चक्र असलेल्या 4 कालखंडापैकी शेवटचा असून कलियुगाच्या अंतानंतर येणारा हिंदू देव विष्णूचा दहावा अवतार आहे. जेव्हा कल्की देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन, तेजस्वी तलवारांनी सर्व पापी अधर्म दुष्ट लोकांचा विनाश करेल तेव्हा सतयुग प्रारंभ होईल.

22/22

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu Check importance and details

पौराणिक कथांनुसार, कलियुगात पाप वाढल्यावर, जगातील अंधार व अधर्म, दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्म स्थापना करण्यासाठी कल्की अवतार प्रकट होईल. कलियुगात कलि राक्षसाचा विनाश करेल. कल्की अवताराला 'निष्कलंक भगवान' या नावाने देखील ओळखला जाईल. हा अवतार 64 कलांनी पूर्ण असलेला 'निष्कलंक अवतार' आहे. कल्की हा अवतार कलियुग व सतयुगच्या संधिकालामध्ये होईल. सर्वप्रथम महाप्रलय येऊन कलियुगाच्या अंतानंतर सत्ययुग (सतयुग) सुरू होईल. कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व 3,102 या वर्षी कलियुग सुरू झाले. त्याच्या पौराणिक कथांची तुलना इतर धर्मातील मशीहा, कयामत, फ्रैशोकरेटी (फारशी) आणि मैत्रेय ,संकल्पनेशी केली आहे. (सर्व फोटो विकिपीडियावरुन साभार)