अद्भूत! 500 वर्षांपूर्वी असं दिसत असावं राम मंदिर; AI Photos पाहून भारावून जाल

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोठमोठे आचार्य आणि पंडित यांच्या उपस्थितीत राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली.   

Jan 22, 2024, 15:25 PM IST

Ram Mandir AI Photos: अयोध्यानगरीमध्ये वातावरण मंगलमय झालं असून, या भूमीमध्ये दैवी शक्तिंचा वावर जाणवत असल्याची प्रतिक्रिया खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. 

1/7

आभूषणं आणि फुलांचा साज

Ayodhya Ram Mandir Pran pratishtha ai shows how ram mandir look before 500 years ago

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीला आभूषणं आणि फुलांचा साज करण्यात आला. प्रभू श्रीराम यांचं हे लोभस रुप डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं.  

2/7

'जय श्रीराम!'

Ayodhya Ram Mandir Pran pratishtha ai shows how ram mandir look before 500 years ago

तिथं रामाची अयोध्यानगरी पुन्हा एकदा त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली असतानाच इथं जगभरातून 'जय श्रीराम!' असा जयघोष झाला आणि सर्वांच्याच अंगावर शहारा आणला. 

3/7

500 वर्षांचा काळ

Ayodhya Ram Mandir Pran pratishtha ai shows how ram mandir look before 500 years ago

या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी 500 वर्षांचा काळ लागला, असं अनेकजण म्हणाले. पण मुळात प्रश्न असा की 500 वर्षांपूर्वी अयोध्या आणि राम मंदिर नेमकं होतं तरी कसं? 

4/7

कशी होती अयोध्या?

Ayodhya Ram Mandir Pran pratishtha ai shows how ram mandir look before 500 years ago

AI तंत्रज्ञानानं या प्रश्नाचंही उत्तर दिलं. इतिहासात नोंद असल्यानुसार 500 वर्षांपूर्वी बाबरचे सुभेदार मीरबाकी यांनी श्रीरामांच्या जन्मस्थळी अयोध्येत एक मशीद उभारलं होतं त्यामुळं या मशिदीला बाबरी मशिद असं नाव देण्यात आलं.   

5/7

शरयूचा काठ

Ayodhya Ram Mandir Pran pratishtha ai shows how ram mandir look before 500 years ago

एआयच्या माध्यमातून दाखवण्यात आल्यानुसार 500 वर्षांपूर्वीच्या अयोध्येमध्ये शरयू नदीचा काठ दाखवण्यात आला आहे. असं म्हणतात की, जेव्हा दशरथानं अनावधानानं मारलेला बाण श्रावणबाळाला लागला, तेव्हा वृद्ध मातापित्यांसाठी तो शरयू नदीतून पाणी भरत होता. 

6/7

काळ पुढे गेला आणि...

Ayodhya Ram Mandir Pran pratishtha ai shows how ram mandir look before 500 years ago

त्या क्षणी पुत्रवियोगात त्या मातापित्यांनी दशरथाला शाप पुत्रवियोह सहन करावा लागेल असा शाप दिला. काळ पुढे गेला आणि हा शापही खरा ठरला. 

7/7

दिव्य मंदिरामध्ये रामलल्ला

Ayodhya Ram Mandir Pran pratishtha ai shows how ram mandir look before 500 years ago

रामलल्ला वडिलांपासून दुरावले, पुढे जे काही घडलं हे सर्वज्ञात आहे. अशा या रामलल्लांना त्यांच्या जन्मभूमीमध्ये पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळालं असून, एका दिव्य मंदिरामध्ये त्यांचा वास असणार आहे.