Ayodhya Ram Mandir Exclusive : रामाच्या नगरीतून थेट तुमच्यासाठी... पाहा असं असेल राम मंदिर!
Ayodhya Ram Mandir : मंदिराचे बांधकाम सुरू असताना शरयू नदीजवळ मातीऐवजी वाळू आढळून आली. हे सर्वात मोठे आव्हान होते. मंदिराच्या जागेवरील सर्व वाळू काढली.
रामराजे शिंदे, झी मीडिया, अयोध्या : प्रभू रामानं 14 वर्षे वनवास भोगला पण मंदिरात पोहोचेपर्यंत मात्र त्यांना शेकडो वर्षे लागली. प्रभू रामावरील श्रद्धा हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. त्याचबरोबर राम भक्तांच्या श्रद्धेनुसार राम मंदिराचा पायाही बांधण्यात आला आहे. राम मंदिराचा पाया रचण्यासाठी देशातील सर्वोत्तम अभियंत्यांनी परिश्रम घेतले आहेत. (Ayodhya Ram Mandir)
1/7
कुठेही सिमेंट, लोखंडाचा वापर नाही
राम मंदिराच्या बांधणीसाठी जमिनीत मोठा खड्डा करण्यात आला. रोलर कॅबॅक्टिंग कॉंक्रिट सिस्टमने 48 स्तर आणि मजबूत खडक तयार केले. आर्टीफिशल रॅाक असेल. खड्ड्याभोवती सिमेंटची भिंत उभारण्यात आली आहे. त्यात कुठेही सिमेंट, लोखंडाचा वापर केलेला नाही. सर्व काम दगडाचे आहे. प्रत्येक दगड कार्बनसाठी तपासला गेला. मंदिराचे वय किमान 1 हजार वर्षे असेल.
2/7
राम भक्त भिंतीला प्रदक्षिणा घालू शकतात
मंदिराच्या पायाभरणीनंतर मंदिर परिसर कसा असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मंदिराच्या कडाभोवती भिंत असेल. त्याला परकोटा म्हणतात. ही संकल्पना फक्त तामिळनाडूमध्ये आहे.ही भिंत 14 फूट रुंद आणि 732 मीटर लांब असेल. या किल्ल्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये एकूण 6 मंदिरे असतील. एकूण 6 मंदिरे असतील! यामध्ये भगवान सूर्य, भगवान शंकर, देवी भगवती, गणपती मंदिर आणि विष्णू मंदिर असेल. पाच देवतांची पूजा केली जाईल.माता अन्नपूर्णा दक्षिण भागात आहे. आणि ही भिंत 14 फूट रुंद असल्याने राम भक्त भिंतीला प्रदक्षिणा घालू शकतात. मात्र हा परकोट तयार करण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
3/7
ज्ञान, निष्ठा, त्याग आणि समर्पणाची मंदिरं.
ज्ञान, निष्ठा, त्याग आणि समर्पणाची मंदिरं.आठ महिन्यांनंतर राममंदिर संकुलात एकूण 7 मंदिरे होतील. ही मंदिरे असतील रामायणातील पात्रांवर आधारित! वाल्मिकी, विश्वामित्र, वसिष्ठ, अगस्त्य ऋषी, शबरी, निषाद राज, गौतम ऋषींची पत्नी अहिल्या यांचे मंदिर असेल. जटायूचाही पुतळा असेल! ज्याला कुबेर टिळा म्हणत! हे मंदिर परिसर असेल.ऋषीमुनींचं ज्ञान, निषाद राजाची निष्ठा आणि शबरी, अहिल्या यांचा त्याग स्मरणात राहील!
4/7
बघू मंदिर कसं असेल?
पूर्वेकडून पश्चिमेकडे मंदिरे कशी आहेत रामलल्ला मंदिर! सिंह गेटमार्गे पूर्वेकडून भाविकांचा प्रवेश असेल. आणि बाहेर पडण्याचा मार्ग पश्चिमेकडून असेल.गर्भगृहात जाण्यासाठी ३२ पायऱ्या चढून जावे लागते. हे मंदिर 350 फूट लांब आणि 268 फूट रुंद आहे. हे मंदिर जमिनीपासून १६१ फूट उंचीवर आहे. आणि शिखरावर ध्वज असेल. जगातील सर्वोत्तम व्यवस्थापन राममंदिर संकुलात पाहायला मिळणार आहे.
5/7
जगातील सर्वोत्तम व्यवस्थापन
22 जानेवारीनंतर दररोज दीड ते दोन लाख लोक येणार आहेत. त्यासाठी 100 शौचालये आणि 100 स्नानगृहे बांधण्यात येणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सुविधाही असतील. मंदिरात चप्पल, मोबाईल पर्स घेऊन जाता येणार नाही. त्यासाठी 25 हजार रुपयांचे लॉकर असेल. पाणी, ड्रेनेज, वीज, रुग्णालय अशा सर्व सुविधा ट्रस्टतर्फे दिल्या जातील, महापालिकेवर कोणताही बोजा पडणार नाही. जगातील सर्वोत्तम व्यवस्थापन राममंदिरात दिसेल.
6/7