BMW, ऑडिला टक्कर देणाऱ्या व्हिंटेज कार आठवतायत? Photo पाहून सांगा नावं

Auto News : व्हिंटेज किंवा क्लासिक असा टॅग या संदर्भांपुढे जोडला जातो आणि पाहता पाहता या गप्पा मारणारे कारप्रेमी त्याच काळात हरवून जातात. 

Sep 06, 2024, 13:46 PM IST

Auto News : हल्लीच्या दिवसांमध्ये जेव्हाजेव्हा कार आणि ऑटो क्षेत्राची चर्चा होते तेव्हा काही संदर्भ हमखास येतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये काही संदर्भ हे गतकाळातीलसुद्धा असतात. 

1/7

Auto News

auto news best classic car padmini jeep which rules indian roads for decades

Auto News : व्हिंटेज कार हा अनेकांच्याच आवडीचा विषय. त्या काळात मोकळ्या रस्त्यांवर धावणाऱ्या या कार काय कमाल दिसल्या असतील ना? असंच अनेकांचं मत. तुमच्या लक्षात आहेत का या व्हिंटेज कार? बरं, यातील भारतीय बनावटीचे कार मॉडेल तुम्हाला माहितीयेत? 

2/7

हिंदुस्तान एम्बेसेडर

auto news best classic car padmini jeep which rules indian roads for decades

हिंदुस्तान एम्बेसेडर: भारतीय ऑटोमोबाइल इतिहासातील सर्वात महत्त्वाची कार म्हणजे एम्बेसेडर. 1985 ते 2014 पर्यंत या कारची निर्मिती करण्यात आली. नेत्यांपासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांचीच या कारला पसंती. 

3/7

प्रेमियर पद्मिनी

auto news best classic car padmini jeep which rules indian roads for decades

प्रेमियर पद्मिनी: 70- 80 च्या दशकात प्रेमियर पद्मिनी ही कार मध्यमवर्गाच्या विशेष आवडीची होती. या कारचं डिझाईन आणि कमाल परफॉर्मन्स तिच्या वेगळेपणाचं महत्त्वाचं कारण ठरला. 

4/7

इम्पाला

auto news best classic car padmini jeep which rules indian roads for decades

इम्पाला: 1958 मध्ये लाँच झालेल्या या कन्वर्टिबल कारचं नाव आफ्रिकेतील हरणाच्या प्रजातीवरून ठेवण्यात आलं होतं. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ही कार पाहायला मिळाली.   

5/7

मारुति 800

auto news best classic car padmini jeep which rules indian roads for decades

मारुति 800: 1993 मध्ये लाँच करण्यात आलेल्या मारुति 800 नं भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात नवी क्रांती आणली. कारच्या किमती आणि तिचा लूक, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारचा परफॉर्मन्स कमालीचा लोकप्रिय झाला आणि ही कार सर्वाधिक विक्रीचा विक्रम मोडताना दिसली.   

6/7

महिंद्रा जीप

auto news best classic car padmini jeep which rules indian roads for decades

महिंद्रा जीप: भारतीय रस्त्यांची घडण आणि दुर्गम भागांच्या गरजा लक्षात घेत महिंद्रा अँड महिंद्राकडून जीपची निर्मिती करण्यात आली. पोलीस, लष्करापासून समान्यांपर्यंत अनेकांनीच या जीपला पसंती दिली. 

7/7

टाटा इंडिका

auto news best classic car padmini jeep which rules indian roads for decades

टाटा इंडिका: ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची कार 1998 मध्ये लाँच करण्यात आली होती. या कारचं इंटेरियर आणि मायलेज तिला मध्यमवर्गामध्ये कमालीची लोकप्रियता देऊन गेलं.