ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, नाहीतर तुमचे खाते होईल रिकामे!

ATM Cash Withdrawal : एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी आपण ज्या मशीनमधून पैसे काढत आहात ते किती सुरक्षित आहे हे तपासून पाहावे. एटीएममध्ये सर्वात मोठा धोका कार्ड क्लोनिंगचा (एटीएम कार्ड क्लोनिंग) असतो. तुमचा डेटा आणि पैसा कसा चोरला जाऊ शकतो हे जाणून घ्या...   

Feb 20, 2023, 16:55 PM IST
1/5

एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये एक डिव्हाइस लावतात, जे तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती स्कॅन करते. यानंतर ते ब्लूटूथ किंवा इतर कोणत्याही वायरलेस डिव्हाइसमधून डेटा चोरतात.

2/5

तुमच्या डेबिट कार्डचा पूर्ण अॅक्सेस मिळवण्यासाठी हॅकरकडे तुमचा पिन नंबर असणे आवश्यक आहे. हॅकर्स कॅमेऱ्याने पिन नंबर ट्रॅक करू शकतात. हे टाळण्यासाठी एटीएममध्ये तुमचा पिन नंबर टाकताना दुसऱ्या हाताने लपवून ठेवा. जेणेकरून त्याचा फोटो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जाऊ शकणार नाही. 

3/5

एटीएममध्ये गेल्यावर एटीएम मशिनच्या कार्डस्लॉटकडे नीट बघा. जर तुम्हाला असे वाटत असेल की एटीएम कार्डस्लॉटमध्ये छेडछाड झाली आहे किंवा स्लॉट सैल झाला आहे किंवा आणखी काही गडबड आहे तर त्याचा वापर करू नका. 

4/5

कार्ड स्लॉटमध्ये कार्ड ठेवताना त्यात ब्लिंक होणाऱ्या लाईटकडे लक्ष द्या. स्लॉटमध्ये हिरवा दिवा जळत असेल तर एटीएम सुरक्षित आहे. पण त्यात लाल किंवा कोणताही लाईट नसेल तर एटीएमचा वापर करू नका. हे काहीतरी चुकीचे लक्षण असू शकते.  

5/5

आपण हॅकर्सच्या जाळ्यात अडकलो आहोत आणि बँकही बंद आहे, असे तुम्हाला कधी वाटत असेल तर तुम्ही पोलिसांशी संपर्क साधावा. याची माहिती पोलिसांना लवकरात लवकर दिल्यास तेथे फिंगरप्रिंट प्रिंट मिळू शकते. आपल्या आजूबाजूला कोणाचे ब्लूटूथ कनेक्शन कार्यरत आहे हे देखील आपण पाहू शकता, ज्यामुळे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे सोपे होते.