'या' रक्षाबंधनाला भावाला लावा केशराचा टिळा, अगणित फायदे जाणून व्हाल अवाक्

Saffron Tilak Benefits : शुभ कार्यात केशराचा टिळा देवी देवतांच्या पूजेसाठी हजारो वर्षांपासून केला जातो. कपाळावरही टिळा लावणे हे अतिशय शुभ मानले जाते. केशर टिळकाचे अगणित फायदे ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. 

Jul 21, 2023, 10:53 AM IST

Saffron Tilak Benefits : हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी कपाळावर टिळक लावण्याची परंपरा आहे. हळद, चंदन, कुमकुम, अक्षत आणि कुंकू अशा विविध टिळक लावलं जातं.  हळद आणि चंदनाचा टिळक लावणे हे अतिशय शुभ मानले जाते. पण तुम्हाला केशराचे टिळकाचे फायदे माहिती आहे का? हे फायदे ऐकून तुम्ही आजपासूनच लावायला सुरुवात कराल.

1/8

या रक्षाबंधनाला तुमच्या भाऊरायाला केशरी टिळक लावा. त्यामुळे सुख समृद्धीचे मार्ग मोकळे होतात. 

2/8

केशरी टिळक लावल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.   

3/8

 केशर टिळक लावल्यामुळे तुमची एकाग्रता सुधारण्यास मदत होते. 

4/8

नकारात्मक ऊर्जेपासून केशर टिळक लावल्याने संरक्षण होते. 

5/8

केशर हे सूर्याशी संबंधित असून केशर टिळक आपण लावल्यास सूर्यासारखी शक्ती आणि चैतन्य प्राप्त होते. 

6/8

त्याशिवाय बृहस्पति म्हणजे गुरु ग्रह बळकट होतो. त्यामुळे खास करु या लोकांनी गुरुवारी केशर टिळक लावावा. 

7/8

व्यक्तीचे विचार शुद्ध होतात. त्याशिवाय तुमचं मन कोणत्याही वाईट प्रवृत्तीच्या आहारी जात नाही.

8/8

केशरमध्ये थोडे पाणी किंवा दूध घालून नीट मिसळून पेस्ट तयार करा आणि आता अनामिकाने हा टिळक कपाळावर लावणे शुभ मानले जाते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)