स्वप्नाची 'सुवर्ण' उडी... आणि अश्रुंच्या धारा!
कोलकाता : लोखंडी पत्र्यांचं उभारलेलं एक शेड... जेवढी लहान जागा तितकीच यात राहणाऱ्या लहानगे, वृद्ध आणि तरुणांची संख्या जास्त... जीर्ण अवस्थेतील एका टीव्हीवर ते आशियाई खेळ पाहत आहेत... त्यांना एक उत्सुकता लागलीय... दुसरीकडे, जकार्तामध्ये सुरू असलेल्या एशियाडच्या हेप्टाथलॉन इव्हेंटमध्ये महिला खेळाडू स्वप्ना बर्मननं सुवर्ण पदकावर कब्जा मिळवला... तसा इथं उपस्थितांच्या आनंदाला पारावार उरला नाही... लहानगे टीव्हीसमोर नाचू लागले, वृद्धां आनंदाश्रू ढाळू लागले... आणि इतर सेलिब्रेशनच्या तयारीला लागले...
Shubhangi Palve
| Sep 01, 2018, 14:22 PM IST
1/8
पहिली सुवर्ण विजेती
2/8
आईच्या भावना अनावर
3/8
पहिल्या स्थानावर
स्वप्नानं सात इव्हेंटमध्ये एकूण 6026 अंकांसोबत पहिलं स्थान मिळवलं. स्वप्नानं उंच उडी (1003 अंक), भाला फेक (872 अंक) मध्ये पहिला तसंच गोळा फेक (707 अंक) आणि लांब उडी (865 अंक) दुसरा क्रमांक मिळवला. स्वप्नाचा विजय पक्का झाला तसं जलपाईगुडीच्या घोषपाडामध्ये स्वप्नाच्या घराबाहेर लोकं जमू लागली... मिठाई वाटली गेली...
4/8
आईच्या अश्रूधारा
5/8
स्वप्नाची जिद्द...
6/8
पायांची सहा बोटं...
7/8
कोण घेणार पुढाकार?
मी राष्ट्रीय क्रीडा दिनाला हे सुवर्ण पदक जिंकलं त्यामुळे ते खासच आहे.... मी इतर लोक वापरतात ते सामान्य बूट परिधान करते. प्रॅक्टीस दरम्यान या बूटांचा त्रास होत होता...असं स्वप्नानं म्हटलंय. यावर, एखाद्या कंपनीनं तुझ्यासाठी खास बूट बनवावेत असं वाटतं का? असा प्रश्न तिला विचारला तेव्हा... 'निश्चितच, त्यामुळे माझ्यासाठी सोपं होईल' असं स्वप्नानं म्हटलंय.
8/8