BMW सारख्या महागड्या गाड्या घेऊन फिरतो बॉलिवूडचा 'हा' लोकप्रिय व्हिलन; पण नेटवर्थमध्ये देतो स्टार कलाकारांना टक्कर

Ashutosh Rana Networth : आज आम्ही तुम्हाला त्या स्टार्सची ओळख करून देत आहोत. जो केवळ नायकच नाही तर खलनायक म्हणूनही लोकांच्या मनावर राज्य करतो. आज हा अभिनेता स्वबळावर करोडोंचा मालक बनला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या कमाईचा मार्ग. 

| Nov 10, 2024, 13:49 PM IST

'दुश्मन' आणि 'संघर्ष' सारख्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिका करून लोकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या आशुतोष राणा यांचा. आज ज्यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान स्टार्सच्या यादीत समाविष्ट आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप संघर्ष करणारा आशुतोष आज करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे आणि अनेक आलिशान कारमध्ये फिरतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घ्या.

1/7

आशुतोष राणा यांचा 10 नोव्हेंबर रोजी 57 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या अभिनेत्याचा जन्म मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे झाला. ज्याने 1995 मध्ये 'स्वाभिमान' या टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

2/7

टीव्हीमध्ये नाव कमावल्यानंतर आशुतोष राणाने 1996 मध्ये 'संशोधन' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्यांना खरी ओळख ‘दुष्मन’ चित्रपटातून मिळाली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

3/7

आशुतोष राणा फक्त हिंदी सिनेमातच नाही तर मराठी, तेलुगु, बंगाली आणि तमिळ सिनेमातही काम केलं आहे. याच कारणामुळे आज ते कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक असून एक लॅविश आयुष्य जगत आहे. 

4/7

मीडिया रिपोर्टनुसार बॉलिवूडमधील हे लोकप्रिय खलनायक आहेत जे 46 कोटींचीं संपत्ती बाळगतात. ते सिनेमांसोबतच ब्रँड एंटोर्समेंटमधूनही कोटी रुपयांची कमाई करतात. 

5/7

तसेच अभिनेता आशुतोष राणा हे कवी आणि लेखक देखील आहेत. जे कायमच आपल्या कवितांनी सगळ्यांचं मन जिंकून घेतात. 

6/7

आशुतोष राणा यांचं मुंबईसोबतच नाही तर पैतृक गावातही एक आलिशान घर आहे. या अभिनेत्याकडे पजेरो, BMW X1 सारख्या लक्झरी कार आहेत. 

7/7

आशुतोष राणा यांचा विवाह अभिनेता रेणुका शहाणे यांच्याशी झाला आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबाबत पोस्ट करत असतात.