Ashadhi Ekadashi 2023 : आठवणीतली वारी; पाहा 2022 च्या आषाढी वारीचे फोटो

Ashadhi Ekadashi 2023 : हाती पताका, गळ्यात टाळ, सोबत अभंगांची जोड आणि आपल्या विठुरायाच्या भेटीची आस मनी बाळगत हजारोंच्या संख्येनं वारकरी मार्गस्थ होत आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक ही वारी रंगत धरणार आहे, तत्पूर्वी आपण पाहूया मागील वर्षीच्या वारीची काही सुरेख छायाचित्र....   

May 30, 2023, 14:04 PM IST

Ashadhi Ekadashi 2023 : मे महिना संपून आता जून उजाडतानाच महाराष्ट्रातील अनेकांना वेध लागले आहेत हे म्हणजे लाडक्या विठुरायाच्या भेटीचे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही अनेक भाविक विठ्ठलाच्या भक्तीप्रती पंढरीच्या वाटेवर निघताना दिसत आहेत.

1/11

सानथोर

ashadhi ekadashi 2023 flash back in 2022 wari updates

वारीमध्ये सानथोर सगळेच उत्साहानं सहभागी होतात. इथं दुजाभाव दूरदूरपर्यंत दिसतच नाही. 

2/11

छोटा वारकरी

ashadhi ekadashi 2023 flash back in 2022 wari updates

वडिलांच्या खांद्यावर विसावलेला छोटा वारकरी. त्यालाही विठ्ठभेटीची आस.... 

3/11

कर्णा

ashadhi ekadashi 2023 flash back in 2022 wari updates

हा आहे कर्णा. वेळापूर येथे समाज आरतीच्या क्षणाची ही दृश्य. जिथं निस्सिम भक्ती आणि भक्तांचा जनसागर इतकंच काय ते चित्र दिसत होतं.   

4/11

ashadi ekadashi 2023 flash back in 2022 wari updates

ठाकुरबुवाची समाधी येथे पार पडलेल्या ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील गोल रिंगण

5/11

आषाढीची वारी

ashadhi ekadashi 2023 flash back in 2022 wari updates

ही आहे एका अव्यक्त नात्याची, निस्सिम भक्तीची, समर्पणाची आणि विश्वासाची..... आषाढीची वारी. 

6/11

एकच जयघोष

ashadhi ekadashi 2023 flash back in 2022 wari updates

माऊली... माऊली... माऊली... असा एकच जयघोष. प्रस्थान सोहळ्यातील जल्लोष.  

7/11

माऊली

ashadhi ekadashi 2023 flash back in 2022 wari updates

माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतानाची काही क्षणचित्र 

8/11

नीरेचं पात्र

ashadhi ekadashi 2023 flash back in 2022 wari updates

नीरेचं विस्तीर्ण पात्र आणि तिथला पवित्र माहोल 

9/11

वारी म्हणजे प्रवास

ashadhi ekadashi 2023 flash back in 2022 wari updates

वारी म्हणजे प्रवास, वारी म्हणजे कुटुंबाची भेट आणि अनेकांसाठी वारी म्हणजे प्रपंच. वारकऱ्यांचं सामान वाहून नेणारं वाहन. 

10/11

विश्रांती

ashadhi ekadashi 2023 flash back in 2022 wari updates

विश्रांतीसाठी थांबलेले वारकरी आणि त्यांच्यासोबत क्षणोक्षणी वावरणाला पंढरीराया.   

11/11

पंढरीनाथ महाराज की जय

ashadhi ekadashi 2023 flash back in 2022 wari updates

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम| पंढरीनाथ महाराज की जय| (सर्व छायाचित्र- विशाल सवने )