बर्लिनच्या थंडीत मलायका-अर्जनचा रोमान्स; शेअर केले खास फोटो

Arjun - Malaika : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेत्रा अर्जुन कपूर हे सध्या बॉलिवुडमधील लोकप्रिय कपल मानले जाते. त्याच्या नात्यावरुन अनेकदा दोघांवरही टीका केली जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत मलायका आणि अर्जुन याला फारसे महत्त्व देत नाही आणि एकमेकांविषयी असलेले प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करुन दाखवतात.

Apr 30, 2023, 18:29 PM IST
1/8

malaika arora and arjun kapoor berlin trip

काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि मलायका सुट्टीसाठी जर्मनीला गेले होते. या जर्मनीच्या सफरीचे फोटो दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. (सर्व फोटो - @arjunkapoor/instagram)

2/8

arjune kapoor elevator Romance

अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दोघांच्या बर्लिन व्हेकेशनेचे फोटो एका मागून एक शेअर केले आहेत. या फोटोमध्येही दोघेही लिफ्टमध्ये रोमान्स करताना दिसत आहे.

3/8

Berlin with Love

"बर्लिन विथ लव्ह" या कॅप्शनसह सर्व फोटो अर्जुन कपूरने शेअर केले आहेत. फोटोमध्ये हे स्टार कपल एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवत आहे.

4/8

malaika arora and arjun kapoor

अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मलायका अरोरासोबत न्यूयॉर्कमध्ये घालवलेल्या खास क्षणांचे रंगीत आणि ब्लॅक अॅण्ड वाईट दोन्ही फोटो शेअर केले आहेत.

5/8

arjun Kapoor standing by the wall in casual look

या फोटोमध्ये अर्जुन कपूर कॅज्युअल लूकमध्ये भिंतीजवळ उभा असलेला दिसतो. या भिंतीवर न्यूयॉर्क आणि बर्लिन लिहिलेले दिसत आहे.

6/8

malaika arora black and white

या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये मलायका बर्लिनच्या रस्त्यावर चालताना दिसत आहे. ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

7/8

malaika arora at flight

या फोटोमध्ये  मलायका अरोरा फ्लाइटमध्ये डुलकी घेताना दिसत आहे. 'इशकजादे' चित्रपटासाठी सलमानला भेटायला जात असतानाच मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली होती.

8/8

Malaika Arora in white dress

आणखी एका फोटोमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा पांढऱ्या ड्रेसमध्ये पायऱ्यांवर पोज देताना दिसत आहे. दरम्यना, 2017 मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यापासून मलायका आणि अर्जुन कपूर एकत्र आहेत.