मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर 6 वर्षांनी अरबाजचा दुसरा 'निकाह'; पाहा अरबाज-शुराचे Wedding Photos

Arbaaz Khan-Shura Khan wedding: बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खान याचा भाऊ अरबाज खानने (Arbaaz Khan) गर्लफ्रेन्ड शूरा खानशी लग्न केलं. या निकाहचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये न्यूली वेड कपल रोमँटिक होताना दिसलं. 

Dec 25, 2023, 11:42 AM IST
1/7

मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर 6 वर्षांनी अरबाज खानने दुसरा निकाह केला आहे. अरबाज-शुराचे Wedding Photos सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.   

2/7

अरबाज खान वयाच्या 56 व्या वर्षी पुन्हा एकदा लग्न केलं आहे. मेकअप आर्टिस्ट शुरा खानसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. या जोडप्याच्या लग्नाला सलमान खानसह संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. शुरा रवीना टंडनसोबत काम करते.

3/7

शुरापूर्वी अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. 

4/7

लग्नाचे सर्व फंक्शन बहीण अर्पिता खानच्या घरी करण्यात आले. अरबाज खानने रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर शूरा खानसोबतच्या लग्नाचं फोटो शेअर केलंय.   

5/7

फोटो शेअर करताना अरबाज खानने लिहिलंय, 'आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत, माझी मैत्रीण आणि मी या दिवसापासून आयुष्यभर प्रेम आणि एकत्र राहण्यास सुरुवात करतोय. आमच्या विशेष दिवशी तुमचं आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे.' असं म्हटलंय.

6/7

अरहान त्याचे वडील अरबाज आणि नवीन आई शूरा खानसोबतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अरबाज आणि शूरा यांची भेट पटना शुक्ला चित्रपटादरम्यान झाली होती आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेम संबंध सुरु झाले. या दोघांनीही आपलं नातं गोपनीय ठेवलं होतं. 

7/7

अरोरा आणि अरबाजने मार्च 2016 मध्ये विभक्त होण्याची घोषणा केली आणि 1998 मध्ये लग्नाच्या 19 वर्षानंतर 11 मे 2017 रोजी अधिकृतपणे घटस्फोट घेतला.