तासनतास एकाच जागी बसून राहत असाल तर..; संशोधक इशारा देत म्हणाले, 'अगदी झोपा काढा पण..'

Sitting for Long Hours in Office: दुपारी वामकुक्षी घेणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. मात्र त्याचवेळेस ही बातमी दिवसभर एका जागी बसून राहणाऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि चिंता करण्यासारखी किंवा समाधान वाटण्यासारखी नेमकी कोणती गोष्ट आहे पाहूयात...

Swapnil Ghangale | Dec 25, 2023, 09:43 AM IST
1/12

any activity is better for heart than sit for long hours

एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की, छोट्या मोठ्या हलचाली करत राहिलं तरी हृदयाचं आरोग्य ठणठणीत राहतं. अगदी चालणं, मॉर्निंग वॉकला जाणं किंवा एका जागी उभं राहणं हे सुद्धा फायद्याचं असतं.

2/12

any activity is better for heart than sit for long hours

कोणतीही हलचाल केली तर हृदयाच्या पेशी अधिक लवचिक होतात आणि हृदय अधिक मजबूत होतं. मात्र या उलट एकाच जागी बसून राहणाऱ्यांना हृदयासंदर्भातील समस्या निर्माण होऊन त्या भविष्यात अधिक गंभीर होऊ शकतात. 

3/12

any activity is better for heart than sit for long hours

दिर्घकाळ एकाच जागी बासून काम करण्याचा सर्वाधिक वाईट परिणाम हृदयावर होतो. एका अभ्यासामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, अनेक तास एका जागी बसून काम करण्याऐवजी अगदी झोपा काढणंही आरोग्यासाठी अधिक फायद्याचं असतं.

4/12

any activity is better for heart than sit for long hours

'डेली मेल'मधील एका वृत्तानुसार आरोग्यासंदर्भात करण्यात आलेल्या या अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की योग्य पद्धतीने झोपा काढणाऱ्यांचं बॉडी मास्क इंडेक्स उत्तम असतं. तसेच वजन नियंत्रणात राहण्यासाठी याचा फायदा होतो.

5/12

any activity is better for heart than sit for long hours

संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, जे लोक एकाच ठिकाणी अनेक तास बसून असतात ते बसल्या बसल्या वेगवेगळे पदार्थ खात असतात. अशा गोष्टींपेक्षा त्यांनी झोपा काढल्यास आरोग्याला अधिक फायदा होऊ शकतो. 

6/12

any activity is better for heart than sit for long hours

झोपा काढल्यास सतत एका जागी बसून राहणं आणि बसल्या जागी खाण्याच्या वाईट सवयींपासून मुक्ती मिळते.

7/12

any activity is better for heart than sit for long hours

हृदयासंदर्भातील समस्यांपासून सुरक्षित राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे व्यायाम करण्याचा आहे. व्यायाम केल्याने हृदय अधिक सुरक्षित राहतं. एका जागी बसून काम केल्याने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.

8/12

any activity is better for heart than sit for long hours

यूनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन और यूनिव्हर्सिटी ऑफ सिडनीने एकत्रितपणे केलेल्या अभ्यासामध्ये 15 हजार 253 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. या लोकांच्या शारीरिक हलचालींवर लक्ष ठेऊन त्याच्या नोंदी घेण्यात आल्या.

9/12

any activity is better for heart than sit for long hours

24 तासांसाठी या 15 हजार 253 जणांच्या शरीरामध्ये एक गॅजेट लावून त्यांच्या शारीरिक हलचाली मोजण्यात आल्या. या अभ्यासामध्ये जे लोक व्यायाम करतात किंवा हलचाल करतात त्यांना हृदयासंदर्भातील समस्या निर्माण होण्याची शक्यता ही एका जागी काम करणाऱ्यांपेक्षा फारच कमी असते. 

10/12

any activity is better for heart than sit for long hours

व्यायाम करणाऱ्या किंवा सातत्याने हलचाल करणाऱ्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाणही कमी होतं. दिवसभरात अगदी 4 ते 12 मिनिटं व्यायाम केला तरी एका जागी बसून राहण्यापेक्षा हे अधिक फायद्याचं ठरतं, असं अभ्यासात दिसून आलं.

11/12

any activity is better for heart than sit for long hours

या अभ्यासामध्ये दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम केला तरी फायदा होता. एका जागी बसून काम करण्याच्या कालावधीतून हे 30 मिनिटं काढून हलका व्यायाम अनेक सकारात्मक परिणाम घडवून आणू शकतो.

12/12

any activity is better for heart than sit for long hours

वजन कमी करणे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करणं तसेच रक्तातील साखर कमी करणे यासारख्या गोष्टी या छोट्या व्यायामाने सहज शक्य आहेत. 6 मिनिटं उत्तमप्रमाणे व्यायाम केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास सुरुवात होते, असा दावा अभ्यास करण्यात आला आहे.