जगातलं महागडं घर Antilia उभारण्याआधी तिथे काय होतं? कोणाची होती जमीन? मुंबईकरांनाही सांगता येणार नाही याचं उत्तर

| Aug 03, 2024, 13:11 PM IST
1/8

जगातलं महागडं घर Antilia उभारण्याआधी तिथे काय होतं? कोणाची होती जमीन? मुंबईकरांनाही सांगता येणार नाही याचं उत्तर

Antilia Currimbhoy Ebrahim Khoja Yateemkhana Land before Purchase Mukesh Ambani

Anitlia : मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत टॉपला आहेत. मुंबईतील कुम्बाला हिलच्या अल्टामाऊंट रोडवरील त्यांचे अलिशान घर पाहून सारेच थक्क होतात. 2014 साली 1.120 जमिनीवर बनलेली ही इमारत जगातील सर्वात महागडं घरं असल्याचं म्हटलं जातं. 

2/8

2 बिलियन डॉलरचा खर्च

Antilia Currimbhoy Ebrahim Khoja Yateemkhana Land before Purchase Mukesh Ambani

ही इमारत बांधण्यासाठी 2 बिलियन डॉलरचा खर्च आला होता. आज याची किंमत 4.6 बिलियन डॉलर आहे. या अलिशान घरात 2 मजले, जिम, स्पा, थिएटर, टेरेस गार्डन, स्विमिंग पूल, मंदिर, आरोग्य सुविधा, 168 कारची पार्किंग आणि 10 लिफ्ट्स आहेत. 

3/8

2010 मध्ये बनून झाले तयार

Antilia Currimbhoy Ebrahim Khoja Yateemkhana Land before Purchase Mukesh Ambani

अ‍ॅटिलिया या इमारतीचे काम 2006 साली सुरु झाले. साल 2010 मध्ये ही इमारत तयार झाली. 8 रिक्टर स्केलपर्यंतच्या भूंकपातही इमारत तग धरुन उभी राहू शकते. पण ज्या जमिनीवर अ‍ॅटिलिया बनलीय, तिथे आधी काय होतं? मुंबईत राहणाऱ्या अनेकांनाही या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल. चला जाणून घेऊया. 

4/8

करीमभाई इब्राहिम खोजा यतीमखाना

Antilia Currimbhoy Ebrahim Khoja Yateemkhana Land before Purchase Mukesh Ambani

या जमिनीवर करीमभाई इब्राहिम खोजा यतीमखाना (अनाथालय) होते. याचे कामकाज वक्फ बोर्डाची एक चॅरीटी पाहायची.1895 मध्ये एक श्रीमंत जहाज मालक करीमभाई इब्राहिम यांनी या अनाथालयाची स्थापना केली होती. 2002 मध्ये ट्रस्टने ही जमिन विकण्याची परवानगी मागितली. चॅरिटी कमिशनने 3 महिन्यात ही परवानगी दिली. 

5/8

2.5 मिलियन डॉलरमध्ये विकली

Antilia Currimbhoy Ebrahim Khoja Yateemkhana Land before Purchase Mukesh Ambani

चॅरिटीने वंचित खोजा मुलांच्या शिक्षणासाठी असलेली ही जमीन जुलै 2002 मध्ये मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅटिलिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडला 2.5 मिलियन डॉलरमध्ये विकली. त्यावेळी जमिनीची किंमत 1.5 बिलियन डॉलर इतकी होती.

6/8

2003 मध्ये मिळाली होती मंजूरी

Antilia Currimbhoy Ebrahim Khoja Yateemkhana Land before Purchase Mukesh Ambani

स्पेनच्या एका द्वीपवरुन प्रेरीत होऊन इमारतीचे नाव अ‍ॅटिलिया असे ठेवण्यात आले. ही इमारत अमेरिकन आर्किटेक्चर कंपनी पर्किन्स अ‍ॅण्ड विलने डिझाइन केली आहे. 2003 मध्ये पालिकेने या इमारतीच्या प्लानला मंजुरी दिली. सन 2006 मध्ये याचे बांधकाम सुरु झाले. सध्या अ‍ॅटिलियामध्ये 600 कर्मचारी काम करतात.यांचा पगार लाखोंमध्ये असल्याचे म्हटले जाते. 

7/8

इमारतीमध्ये 3 हॅलिपॅड

Antilia Currimbhoy Ebrahim Khoja Yateemkhana Land before Purchase Mukesh Ambani

अ‍ॅटिलियाचे आतील डिझाइनसाठी कमळ आणि सुर्याच्या आकाराचा वापर करण्यात आलाय.बिल्डिंगच्या प्रत्येक माळ्याची डिझाइन आणि प्लान वेगवेगळा आहे. या इमारतीमध्ये 3 हॅलिपॅड आहेत पण चालू स्थितीत नाहीत.

8/8

पूजा आणि वास्तू दोषाचे निवारण

Antilia Currimbhoy Ebrahim Khoja Yateemkhana Land before Purchase Mukesh Ambani

नोव्हेंबर 2010 मध्ये अॅण्टिलियामध्ये गृह प्रवेश सोहळा झाला होता. पण 'दुर्भाग्या'च्या भीतीन अंबानी परिवार या इमारतीत तात्काळ राहायला आला नाही. त्यांनी जून 2011 मध्ये साधारण 50 पंडितांनी अॅण्टिलियामध्ये पूजा आणि वास्तू दोषाचे निवारण केले. यानंतर सप्टेंबर 2011 मध्ये अंबानी परिवार अ‍ॅटिलियामध्ये राहायला आला.