सेमी-न्यूड सीन्स, नको ती वाक्य अन्... Animal मधल्या 'या' 5 गोष्टी साऱ्यांनाच खटकल्या; धक्काच बसेल

Animal Movie Problematic Themes: अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंधाना, अनिल कपूरसहीत बॉबी देओलच्या अभिनयाने नटलेला 'अ‍ॅनिमल' चित्रपट सध्या तिकीटबारीवर तुफान कमाई करत आहे. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच तो वादात अडकला आहे. आता या चित्रपटातील अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला जात आहे. यामध्ये अगदी सेमी न्यूड सिन्सपासून ते चित्रपटातून लपूनछपून महिलांसंदर्भात दिल्या जाणाऱ्या नको त्या संदेशांपर्यंतचा समावेश आहे. या गोष्टी कोणत्या आहेत जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Dec 03, 2023, 16:44 PM IST
1/11

Animal Movie Problematic Themes

'अ‍ॅनिमल' चित्रपटाने 2 दिवसांमध्ये 130 कोटींची कमाई केली आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपट सुपरहीट ठरला आहे. संदीप वांगा रेड्डीने दिग्गदर्शित केलेला हा चित्रपट तिकीटबारीवर सुसाट कामगिरी करत असून अनेक विक्रम त्याने मोडलेत.

2/11

Animal Movie Problematic Themes

मात्र त्याचवेळी 'अ‍ॅनिमल' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी पुरुष हे महिलेपेक्षा श्रेष्ठ असतात असा संदेश अखोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. 

3/11

Animal Movie Problematic Themes

'अ‍ॅनिमल'मधील अनेक सीन्स आणि प्रसंग हे पुरुषसत्ताक समाज असावा असा छुपा संदेश देत असल्याचा आरोप टीकाकारांनी केला आहे. बऱ्याच जणांनी चित्रपटामध्ये खटकणारे असे सिन्स कोणते आहेत ते सांगितलं आहे. हे पाच सीन्स कोणते ते पाहूयात...

4/11

Animal Movie Problematic Themes

'अ‍ॅनिमल' चित्रपटातील एका सीनमध्ये रणबीर कपूर त्याच्या बहिणीला, "तू व्हिस्की का पित आहेस? वाईन पी," असा सल्ला देताना दिसतोय. यावरुन महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करणारा छुपा संदेश दिला जतोय असं टीकाकारांचं म्हणणं आहे.

5/11

Animal Movie Problematic Themes

रणबीर कपूर त्याच्या सर्वात शत्रूविरोधात म्हणजेच अबरारविरोधात लढाईसाठी जाताना आपल्या पत्नीला, "ऐक, मी परत आलो नाही तर तू दुसरं लग्न करु नकोस," असं सांगताना दिसतो. यावरही महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

6/11

Animal Movie Problematic Themes

चित्रपटातील कथानकामध्ये रणबीर सिंगचं रश्मिकाने साकारलेल्या भूमिकेतील तरुणीबरोबर लग्न झालेलं दाखवण्यात आलं आहे. मात्र लग्नानंतरही रणबीर जाणूनबुजून अन्य एका महिलेशी शरीरसंबंध ठेवतो. या दोघांमधील एक सेमी न्यूड सीन चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

7/11

Animal Movie Problematic Themes

विवाहित असूनही एका महिलेबरोबर सेक्स केल्यानंतर रणबीर त्याच्या या कृत्याचं समर्थन करताना दिसतो. वडिलांवर हल्ला करणाऱ्यांना समोर आणण्यासाठी आपल्याला हे करावं लागलं असा युक्तीवाद रणबीर करतो. हा प्रकार महिलांची फसवणूक करण्यास प्रोत्साहन देण्यासारखा असल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.

8/11

Animal Movie Problematic Themes

एका सीनमध्ये रणबीर रश्मीकाला तिच्यासाठी योग्य काय अयोग्य काय हे सांगताना दिसत आहे. रणबीर तिला आपली बाजू समजवून सांगताना तू मलाच का निवडावं याबद्दल समजावत असतो. याचवेळी तो रश्मीला तू मला निवड कारण मी 'अल्फा मेल' आहे असा संदेश देतो.

9/11

Animal Movie Problematic Themes

'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये 'अल्फा मेल'मधील संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटामधील कुटुंबातील घरांमधील महिलांचं काम केवळ मुलांना जन्म देण्याचा असतो असं दाखवण्यात आलं आहे. 

10/11

Animal Movie Problematic Themes

महिलांनी मुलांना जन्म द्यायचा आणि भविष्यात ही मुलं कुटुंबाचा सूड उगावण्याच्या नावाखाली संघर्ष पुढील पिढीत सुरु ठेवतील असं 'अ‍ॅनिमल'  चित्रपटातून दर्शवण्याचा प्रयत्न झाल्याचं टीकाकारंचं म्हणणं आहे.

11/11

Animal Movie Problematic Themes

तुम्ही 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहिला आहे का? वरीलपैकी किती मुद्दे तुम्हाला योग्य वाटले? कमेंट करुन नक्की कळवा...