श्रीदेवींच्या 'या' चित्रपटातही झळकलेली तृप्ती डिमरी; आठवतंय?

Bollywood Actress Tripti Dimri: अ‍ॅनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. तृप्ती, विकी कौशलसोबत 'बॅड न्यूज' सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Jul 11, 2024, 17:09 PM IST
1/10

तृप्ती, विकी कौशलसोबत 'बॅड न्यूज' सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

2/10

अभिनेत्री तृप्ती डिमरी ही मुळची उत्तराखंड इथली आहे. 

3/10

तृप्ती करियरच्या सुरुवातीच्या काळात मॉडेलिंग करत होती. त्यानंतर तिने पुण्यातील FTII मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. 

4/10

तृप्ती तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल ही तितकीच चर्चेत असते. तृप्ती सॅम मर्चंटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. सॅमसोबतचे तिचे फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाले होते.   

5/10

अ‍ॅनिमलमधून प्रसिद्ध झालेल्या तृप्तीने श्रीदेवीच्या 'मॉम' सिनेमात छोटीशी भूमिका साकारली होती. 

6/10

2016 मध्ये तृप्तीने 'लैला मजनू' या सिनेमासाठी ऑडीशन दिली होती, मात्र तिला या सिनेमात नाकारण्यात आलं होतं.   

7/10

त्यानंतर पुढच्या वर्षभरातच तिला 'लैला मजनू' फिल्मसाठी सिलेक्ट केलं.मात्र हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चालला नाही.    

8/10

तृप्तीने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं की, पहिल्या सिनेमानंतर तिला खूप स्ट्रगल करावा लागला. 

9/10

पहिला वहिला सिनेमा फ्लॉप गेल्यानंतर तिला प्तचंड मानसिक त्रास झाला होता. तृप्तीने सांगितलं की सहा सात महिने ती कामाच्या शोधात होती. 

10/10

मात्र 'अ‍ॅनिमल' सिनेमानंतर तिला प्रसिद्धी मिळाली. तृप्तीने आता मुंबईत स्वत:चं घर घेतलं आहे.