शेरवानीवर स्पोर्ट्स शूज... अनंत अंबानीचा कुटुंबासह लग्नातला पहिला फोटो समोर

Anant Ambani Wedding Family Photos : आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी याचा विवाह सोहळा पार पडतोय. अनंत अंबानी राधिका मर्चंटचा विवाह सोहळा मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये संपन्न होत असून या सोहळ्यासाठी देश-विदेशील दिग्गज आणि सेलिब्रेटी उपस्थित आहेत. 

राजीव कासले | Jul 12, 2024, 18:49 PM IST
1/6

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या विवाहसोहळ्यावर संपूर्ण जगाची नजर आहे. जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक असलेल्या या सोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज आणि सेलिब्रेटिनी हजेरी लावली आहे. या विवाह सोहळ्यातील अंबानी कुटुंबाचा पहिला फोटो आता समोर आला आहे. 

2/6

या फोटोत संपूर्ण अंबानी कुटुंब आहे. मुकेश आणि नीता अंबानी, आकाश आणि ईशा अंबानी त्यांची दोन मुलं, मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा आणि पती आनंद पिरामल आणि नवरा मुलगा अनंत अंबानी असे सर्व जण या फोटोत दिसत आहेत. 

3/6

नवरा मुलगा अनंत अंबानी याने भगव्या रंगाची बारीक नक्षीकाम केलेली शेरवानी परिधान केली आहे.  शेरवानीवर अनंत अंबानीने स्पोर्ट्स शूज घातल्याने सर्वांच्या नजरा त्यावर टिकल्या आहेत. करोडोंची किंमत असलेल्या कारमधून अनंत वरात घेऊन जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दाखल झाला. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंबही होतं. 

4/6

मुकेश अंबानी नीता अंबानीदेखील या फोटोत सर्वांच लक्ष वेधून घेतायत. नीता अंबानी यांच्या सौंदर्याची सर्वांनाच भूरळ पडलीय. तर मुकेश अंबानी यांनी फिकट गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केलीय. नीता अंबानी देवाची सोन्याची प्रतिमा घेऊन उभ्या असलेल्या दिसतायत. 

5/6

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि तिचा पती उद्योपती आनंद पीरामल मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसतायत. ईशाने हलक्या गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केलाय. तर यावर सिल्व्हर ज्वेलरीत ती खुलून दिसतेय. आनंद पीरामलनेही गुलाबी रंगाचा शेरवानी परिधान केलीय.

6/6

मुकेश अंबानी यांचा मुगा आकाश अंबानी आणि सून श्लोका अंबानी आपल्या दोन्ही मुलांसह या फोटोत दिसताय. श्लोकाने पिंक आऊटफिट तर आकाशने पत्नीबरोबर मॅचिंग आऊटफिट परिधान केलंय.