तब्बल ₹17000 कोटींची गडगंज श्रीमंती असतानाही कैक वर्ष जुन्या घरातच का राहतात आनंद महिंद्रा?

Anand Mahindra House : 'गुलिस्तान' हेच ते ठिकाण जिथं राहतात भारतातील अग्रगणी उद्योजक... पण या जुन्या वास्तूचं इतकं महत्त्वं काय? 

Dec 31, 2024, 14:35 PM IST

Anand Mahindra House : आनंद महिंद्रा कायमच व्यवसाय क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळं चर्चेत येत असतात. ट्विट असो किंवा एखाद्या कार्यक्रमातील एखादं वक्तव्य, महिंद्रा सातत्यानं सामान्यांमध्येही चर्चेचा विषय ठरतात. 

 

1/7

आनंद महिंद्रा

anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house

Anand Mahindra House : X या माध्यमातून विविध विषयांवर आपली मतं मांडणाऱ्या आनंद महिंद्रा यांना तरुण वर्गातही कमालीची प्रसिद्धी मिळते. एखादी संकल्पना असो किंवा एखादा विचार, तो मांडण्याची महिंद्रा यांची पद्धत कमालच.   

2/7

उद्योगजगत

anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house

उद्योगजगतात प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या याच आनंद महिंद्रा यांचा अनेकांच्या मनाला भावणारा आणखी एक गुण म्हणजे त्यांचं साधं राहणीमान. तब्बल 17000 कोटी रुपयांच्या संपत्तीचा डोलारा असण्यासमवेत आनंद महिंद्रा रियल एस्टेट, डिफेंस अशा क्षेत्रांमध्येही योगदान देताना दिसतात.   

3/7

137 कंपन्यांची नोंद

anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house

एकट्या महिंद्रा उद्योग समुहाच्या नावावर  137 कंपन्यांची नोंद असून, लक्ष्मीचा वरदहस्त असतानाही आनंद महिंद्रा एका जुन्या, कैक वर्षांपूर्वी बांधलेल्या एका घरातच राहतात. आनंद गोपाळ महिंद्रा हे महिंद्रा उद्योगसमुहाचे सहसंस्थापक जगदीशचंद्र महिंद्रा यांचे नातू. जे आजही त्यांच्या आजोबांच्याच घरात राहत असून, अतिशय सामान्य जीवनशैलीला प्राधान्य देतात. ही तिच वास्तू आहे, जिथून महिंद्रा उद्योग समुहाची सुरुवात झाली होती.   

4/7

बालपण

anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house

आनंद महिंद्रा यांच्या आजोबांनी मुंबईतील नेपियन सी रोडवर एक घर भाड्यानं घेतलं होतं. या घरात त्यांनी वास्तव्यास सुरुवात केली तेव्हा आनंद यांचा जन्मही झाला नव्हता. पण, त्यांचं बालपण याच घरात गेलं. कैक वर्षे त्यांचं कुटुंब इथं राहिलं. 

5/7

गुलिस्तान

anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house

पुढं घराच्या नुतनीकरणाच्या कारणास्तव घर मालकानं हे घर तोडण्याची भाषा केली आणि आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी हे घर 270 कोटी रुपये मोजत खरेदी केलं. 13000 भूखंडावर उभ्या असलेल्या या घराचं नाव 'गुलिस्तान' ठेवण्यात आलं. तेव्हापासून आनंद महिंद्रा पुन्हा याच घरात राहू लागले.   

6/7

कुटुंब

anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house

आनंद महिंद्रा यांच्या कुटुंबाविषयी सांगावं तर, त्यांची पत्नी पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून, त्या वर्व आणि द इंडियन क्वार्टरलीच्या मुख्य संपादिका आहेत. 

7/7

वडिलोपार्जित व्यवसाय

anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house

महिंद्रा यांच्या मुली आलिका आणि दिव्या सिनेक्षेत्रासह डिझायनिंग क्षेत्रात सक्रिय असून, या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. आनंद महिंद्रा यांच्या दोन्ही मुली परदेशात वास्तव्यास असून, त्यांनी परदेशी मुलांशी लग्न केलं असल्याचं म्हटलं जातं. वडिलोपार्जित व्यवसायामध्ये त्यांना रस नसल्याचंही म्हटलं जातं.