'मी प्रेमात पडते पण...', प्राजक्ता माळीचा रिलेशनबद्दल खुलासा! म्हणाली, 'ज्या पद्धतीने लग्न...'

Prajakta Mali On Marriage & Love Story: सध्या प्राजक्ता माळी ही वेगळ्याच कारणाने चर्चेत असली तरी तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. याचनिमित्ताने तिचे लग्न आणि प्रेमाबद्दल काय विचार आहेत पाहूयात...

| Dec 31, 2024, 14:28 PM IST
1/11

prajaktamalimarriage

प्रसारमाध्यमांमध्ये सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच चर्चेत असताना तिचे लग्न आणि रिलेशनबद्दल विचार काय आहे यावर तिच्याच एका मुलाखीच्या माध्यमातून नजर टाकूयात...

2/11

prajaktamalimarriage

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची अँकर म्हणून घराघरात पाहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आली असून स्वत: प्राजक्ताने यानंतर पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका मांडली.

3/11

prajaktamalimarriage

यानंतर सुरेश धस यांनी 30 डिसेंबर रोजी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो म्हणत प्राजक्ता माळीची माफी मागितली. त्यामुळे या वादावर पडदा पडला असला तरी प्राजक्तासंदर्भातील सोशल मीडियावरील चर्चेमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे.  

4/11

prajaktamalimarriage

प्राजक्ता माळी ही सध्याच्या घडीला मराठीमधील आघाडीच्या आणि सेल्फमेड अभिनेत्रीपैकी एक आहे.

5/11

prajaktamalimarriage

अगदी 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेपासून ते हास्यजत्रापर्यंतचा प्राजक्ता माळीचा प्रवास प्रेरणादायी आहे. मात्र प्राजक्ता अजूनही सिंगलच आहे. 

6/11

prajaktamalimarriage

मध्यंतरी प्राजक्ताने तिला लग्नाची भीती वाटते असं एका मुलाखतीत म्हटलं होतं. प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी 'मुक्काम पोस्ट मनोरंजन' या पॉडकास्टअंतर्गत दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रिलेशनशीप आणि लग्नाबद्दलची मतं मनमोकळेपणे व्यक्त केली होती.   

7/11

prajaktamalimarriage

प्राजक्ताने यावेळेस अगदी मनमोकळेपणे लव्ह लाईफबद्दल आपल्याला काय वाटतं आणि सध्याच्या लग्नसंस्थेबद्दलही भाष्य केलं होतं. मला लग्न आणि त्याबरोबर येणाऱ्या कमिटमेंटची भीती वाटते असं प्राजक्ताने सांगितलेलं. 

8/11

prajaktamalimarriage

"मी प्रेमात पडते पण मला लग्न, कमिटमेंटची भीती वाटते. मला स्वत:सोबतच राहायला आवडतं. मला एकटं जगायला आवडतं," असं प्राजक्ताने सांगितलेलं.

9/11

prajaktamalimarriage

"मी आतापर्यंत स्वतंत्र आयुष्य जगत आली आहे. 2013 पासून मुंबईत एकटी राहत असून मला या स्वातंत्र्याची खूप सवय लागली आहे," असंही प्राजक्ताने यावेळेस नमूद केलेलं. 

10/11

prajaktamalimarriage

"कलाकार म्हणून मी खूप मोकळ्या मनाची असल्यानेच मला कोणत्याही बंधनात अडकण्याचा फोबिया वाटतो. आत्ता ज्या पद्धतीने लग्न संस्था विस्कळीत होत चालली आहे ते पाहून जरा भीती वाटते," असंही प्राजक्ताने यावेळेस म्हटलं.  

11/11

prajaktamalimarriage

"मी काही तेवढीही प्रेमात पडलेली नाही. मी पडले पण जेव्हा मला कळलं ही हा मुलगा माती खातोय तेव्हा मी त्याला टाटा बाय बाय केलं. त्यामुळे सध्या मी सिंगलच आहे," असंही प्राजक्ताने म्हटलं होतं.