पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आंब्यांचा नैवेद्य । पाहा फोटो

अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आलाय. आंब्यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे.

Surendra Gangan | Apr 22, 2023, 12:11 PM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास करण्यात आली. मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती.

1/7

अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास करण्यात आली.

2/7

अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. या अक्षय्य तृतीयेनिमित्त बाप्पाला 11 हजार आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. 

3/7

आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

4/7

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. 

5/7

लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास करण्यात आली. मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती.

6/7

दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये हे आंब्याचं वाटप होणार आहे.

7/7

पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.